Maharashtra

चोपडा नगर पालिका नगराध्यक्षासह गटनेते यांच्यावरील एट्रासिटीचा गुन्हा उच्च न्यायलयाने केला रद्द…
लोकनियुक्त नगराध्यक्ष मनीष चौधरी यांची पत्रकार परिषदेत माहिती

चोपडा प्रतिनिधी सचिन जयस्वाल
चोपडा नगर पालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष मनीषा चौधरी व चोपडा विकास मंच चे गटनेते जीवन चौधरी,रमेश शिंदे यांचा विरुद्ध मंगलाबाई संजय भिल चोपडा शहर पोलिसांत अनुसूचित जाती जमाती अत्याचार, प्रतिबंधक कायदा सन १९८९ चे सुधारणा अधिनियम सन २०१५ चे सुधारणा प्रमाणे १३ सप्टेंबर२०१३ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गून्ह्या विरूद्ध नगराध्यक्षा मनीषा चौधरी यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता सदर चा अर्ज उच्च न्यायलयाने मंजूर करून चोपडा पोलीस स्टेशन ला केलेली फिर्याद रद्दबातल केली आहे.नगराध्यक्षा मनीषा चौधरी यांचा वतीने अॅड. निर्मल देशमुख,विनोद पाटील यांनी काम पाहिले
आमचा न्यायदेवेतेवर विश्वास असून चोपडा शहरातील सर्व नगरसेवक विकासासाठी कटिबध्द आहे विकास हाच आमचा ध्येय असणार आहे खोटे षडयंत्र रचून बनावट गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणून खोटे गुन्हे दाखल करून त्याचा माघे उभे राहणे ही तालुक्याची संस्कृती नाही असे मत गटनेते जीवन चौधरी यांनी पत्रकार परिषदेत मांडले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button