Amalner

अमळनेर येथे एस टी कामगारांच्या समर्थनार्थ प्रांत कार्यालयावर मोर्चा…

अमळनेर येथे एस टी कामगारांच्या समर्थनार्थ प्रांत कार्यालयावर मोर्चा…

अमळनेर येथिल एस टी कामगारांनी आज एस टी चे राज्यशासनात विलनिकरण करावे या मागणीसाठी नागरी हित दक्षता समिती आणि सामाजिक संघटनांच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला.
अमळनेर येथिल एस टी कर्मचाऱ्यांचा लढा विलानीकरणासाठी सुरुच असून या लढ्याला विविध सामाजिक संघटनांचे पाठबळ लाभत आहे.अमळनेर बस स्थानक येथे शेकडोंच्या संख्येने एस टी कर्मचारी एकत्रित झाले होते.यावेळी पोलिस प्रशासनाने मोर्चाचे नेत्यांना त्रिपुरा हिंदू मुस्लिम दंगलीच्या पार्श्वभूमीवर मोर्चा न काढण्याची नोटीस दिली. मात्र संयोजकांनी मोर्चा काढण्यावर ठाम राहून मुस्लिम व हिंदू कर्मचारी एकत्रित पुढे येत हम सब एक है! घोषणा देत बस स्टँड येथून मोर्चा ला सुरवात केली.सदर मोर्चा विजय मारुती मंदिर,धुळे रोड मार्गे विश्राम गृह ,बळीराजा स्मारक आणि प्रांताधिकारी कार्यालयात मोर्चा पोहचला. यावेळी मोर्चेकर्यांना प्रा.अशोक पवार यांनी मार्गदर्शन करतांना,’कोणतेही आंदोलन मोर्चा शिवाय पूर्ण होऊच शकत नाही,एस टी वकर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांच्या पाठीशी समाज उभा आहे!’ असे सांगितले.यावेळी युवा कल्याण फाऊंडेशन चे संदिप घोरपडे,राजे मल्हारराव होळकर प्रतिष्ठानचे बन्सीलाल भागवत,शेतकरी नेते अरुण देशमुख , मगन भाऊसाहेब,शशि पाटील यांनी मार्गदर्शन केले.तर मोर्चाला पाठींबा देणाऱ्या सर्व संघटना व सामाजिक पदाधिकाऱ्यांचे आभार सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी मानले.या प्रसंगी मुस्लिम युथ सेवा फाऊंडेशन चे शेख रियजुद्दीन,हजरतबाबा ताज फाऊंडेशन चे ऍड रज्जाक शेख,प्रवासी संघटनेचे भास्कर बोरसे, हुसेनी सेना फाऊंडेशन चे मोईन अली, जेष्ठ कार्यकर्ते डी एम पाटील,मगन भाऊसाहेब, गोपीचंद शिरसाठ,मुरलीधर पवार,आनंदा हडप आदि प्रमुख मान्यवर सहभागी झालेले होते. आंदोलनात होतात्म्य पावलेल्या कामगारांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करून मोर्चा विसर्जित करण्यात आला.
एस टी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवाश्यांचे,जेष्ठ वृद्ध,लहान व्यापारी, विद्यार्थी, ग्रामिण लोकांची प्रचंड गैरसोय होत असून आर्थिक नुकसानही होत आहे.म्हणून एस टी कामगारांच्या न्याय्य मागण्या शासनाने मंजून करून संप मिट वावा या मागणीचे निवेदन एस टी कर्मचार्यांच्या वतीने विविध सामाजिक संघटना च्या पदाधिकारी ,एस टी कामगार संघटनांचे नेते यांचेसह नागरिकांच्या स्वाक्षरीने यावेळी प्रांताधिकारी यांचे प्रतिनिधी पुरवठा अधिकारी बावणे यांना देण्यात आले.
मोर्चा यशस्वीतेसाठी
प्रविण मिस्त्री,हेमंत सूर्यवंशी, रविंद्र संदानशिव,मनोज पाटील, आय एस शेख,जे यु,पठाण,एस टी मोरे,बी एस वानखेडे,एस सी महाले,निलेश पोळ,एम एफ बागवान,गजानन सूर्यवंशी,योगेश घोडके,भावना सोनवणे,सविता पाटील, मंजुषा शिंदे,आशाबाई पाटील, वैशाली पाटिल, शितल पाटील,दर्शन सोमवंशी,महेंद्र चौधरी यांचेसह कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button