Champa

चांप्यात जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद

चांप्यात जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसादअनिल पवारचांपा ता , २२:जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्य सरकारने रविवारी २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू चे आवाहन केले. कोरोनावर मात करण्यासाठी नागपूर ग्रामीण सज्ज झाले त्यातच उमरेड तालुक्यातील चांपा गावातही शंभर टक्के प्रतिसाद मिळल्याचे चित्र दिसले .चांप्यात जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसादकधी न थांबणारा नागपूर उमरेड म्रूत्यू महामार्गावर शेकडो वाहनाची अवाजवी सुरू असते हा मार्ग कधीही कोणासाठी थांबलेला नाही इतिहासात पहिल्यांदाच कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी हा मार्ग थांबला व चांप्यात सर्वत्र रस्ते , प्रभाग , थांबले आहेत .सरपंच अतिश पवार यांच्या आवाहनाला शेतकरी कामगार शेतमजूर इत्यादी चांपाकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला .चांपा येथे शनिवारी भरणारा आठवडी बाजारात सर्वत्र शुकशुकाट पसरले होते .चांप्यात शनिवारी आठवडी बाजार न भरल्याने गावांतील भाजीपाला विक्रेत्यांना सरपंच अतिश पवार यांनी शनिवारी आठवडी बाजार बंदचे आवाहन केले .त्यातच काही भाजीपाला विक्रेते सरपंच अतिश पवार यांना विचारपूस केली व पर्याय म्हणून सरपंच अतिश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भाजीपाला विक्रेत्यांनी सर्व प्रभागात घरोघरी जाऊन भाजीपाला पुरवण्यात आला .

कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी चांपाकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने सर्व नागरिकांचे आभार मानले .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button