Pandharpur

पंढरीत बैलगाडी छकडा आणि टांगेवाल्याच्या घोडा व बैलाचे खाद्य वाटप करून संत सेना महाराजांची पुण्यतिथी केली साजरी…

पंढरीत बैलगाडी छकडा आणि टांगेवाल्याच्या घोडा व बैलाचे खाद्य वाटप करून संत सेना महाराजांची पुण्यतिथी केली साजरी…

प्रतिनिधी रफिक अत्तार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून हाताला काम नसताना छकडा, बैलगाडी वाले आणि टांगेवाले यांच्या समोर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न उपस्थित झाला संत सेना महाराजांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून राष्ट्रीय नाभिक संघटनेच्या वतीने युवक शहर अध्यक्ष तुकाराम चव्हाण यांनी चारा व भुसा भेट देऊन सामाजिक बांधिलकी जपली मंगळवेढ्याचे सोमनाथ आवताडे,प्रणव परीचारक व नगरसेवक, मान्यवरांच्या हस्ते आणि समाज बांधवांच्या उपस्थितीत चारा व भुसा वाटप करण्यात आला.श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून पंढरपूर राष्ट्रीय नाभिक संघटनेच्या वतीने पंढरपुरात करोनाच्या मधल्या काळात ज्यांच्यावर खरोखरच बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा टांगेवाले व बैलगाडी, छकडावाल्यांना चारा वाटप, भुसा वाटप व बैलांचे खाद्य वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी मा.नगरसेवक नागेश भोसले, नगरसेवक इब्राहिम बोहरी, लक्ष्मण तात्या शिरसाट, संजय निंबाळकर, शिंदे सह राष्ट्रवादीचे नेते श्रीकांत शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय नाभिक युवक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सतीश चव्हाण ,युवक शहराध्यक्ष तुकाराम चव्हाण, कार्याध्यक्ष अनिल शेटे, राष्ट्रीय शहराध्यक्ष गणेश माने, मनोज गावडे, महेश माने यांनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button