Pandharpur

एक हात मदतीचा करत बांधकाम व्यवसायिक( डी बिल्डर) दत्ता बागल गेले धावून

एक हात मदतीचा करत बांधकाम व्यवसायिक( डी बिल्डर) दत्ता बागल गेले धावून

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील सोनू तू फक्त पंढरपूर चे नाव मोठं कर,,, काल स्टार प्रवाह या चॅनल वर मी_होणार_डान्स_सुपरस्टार या शो मध्ये पंढरपूर चा युवा डान्सर चा कार्यक्रम मध्ये संपूर्ण महाराष्ट्राने त्याचे कौतुक केले हे करत असताना ज्यावेळी त्याला प्रश्न केला गेला की तू काय करतो त्यावर त्याने उत्तर दिलं ,मी काम करतो 7 हजार पगार मिळतो ते 7000 व आई मोलमजुरी करून आणलेले 3000 असे 10000 घराचा हप्ता भरतो,पण गेली एक महिना शो मुळे मी मुंबईत आहे ,बँक वाले सारखे आई ला फोन करतात दंड वाढत चालला,
त्यावर अभिनेता अंकुश चौधरी यांनी त्याला मदत म्हणून शब्द दिला की तुझे हप्ता मी भरतो,हा शो पहात असताना पंढरपूर येथील कायम जनतेच्या अडीअडचणी काळात मदत करणारे आमचे सहकारी मित्र डी बिल्डर (दत्ता बागल ) यांनी हा शो पहिला अन त्यांच्या मनातील माणूसकी जागी झाली ,आज सकाळी फोन केला दादा आपल्याला त्या सोनू कदम ला मदत करायची आहे. अन आम्ही तात्काळ सौरभ नेहतराव यांच्या मदतीने सोनू च्या घरी जाऊन त्याच्या मातोश्री ना 11000 (अकरा हजार) रोख रक्कम देऊन मदत केली ,दोन खोल्या आसलेले घर ,कोणत्याही प्रकारची डान्स कल्लास नसतानाही एवढे लांबचा पल्ला गाठणे हे खूप अभिमानस्पद बाब आहे,पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्वांनी सोनू कदम ला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे ,आप आपल्या परीने मदत करावी असे आवाहन केले
यावेळी बांधकाम व्यवसायिक दत्ता बागल डी बिल्डर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव श्री श्रीकांत शिंदे गणेश बागल आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button