Solapur

विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात अखंडित ठेवण्यासाठी ब्रिज कोर्स महत्वाचा -डाॅ.जितेंद्र काठोळे

विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात अखंडित ठेवण्यासाठी ब्रिज कोर्स महत्वाचा -डाॅ.जितेंद्र काठोळे

सोलापूर : केंद्र-अरण आणि केंद्र -उपळाई (बु) तालुका-माढा जिल्हा सोलापूर यांची संयुक्त शिक्षण परिषद – कार्यशाळा गुगल मिट ॲपद्वारे ऑनलाइन संपन्न झाली.या वेळी डॉ. जितेंद्र काठोळे वरिष्ठ सहाय्यक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, अकोला यांनी व्यक्त केले. ऑनलाइन शिक्षण परिषदेचे प्रास्ताविक आणि स्वागत अरण केंद्राचे केंद्र प्रमुख डॉ. श्री. विलास काळे यांनी केले. या शिक्षण परिषद कार्यशाळेस उपळाई केंद्राचे केंद्र प्रमुख श्री. दिगंबर काळे, अरण व उपळाई बु. केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक उपस्थित होते. वृक्षारोपण एक चळवळ उभी करावी असे आवाहन दोन्ही केंद्रातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना श्री.दिगंबर काळे यांनी केले.
डॉ. विलास काळे यांनी प्रशासकीय बाबींची माहिती दिली. यामध्ये
१००%विद्यार्थांना दाखल करणे व मोफत प्रवेश, ऑनलाईन पद्धतीने प्रभावी शिक्षण, शाळा प्रशासकीय बाबी पूर्ण करून घेणे. ० ते १८ वयोगटातील मुलांसाठी आरोग्य शिबीर आयोजित करणे. संभाव्य कोविड ची तिसरी वाट उपाय योजना, पुर्वतयारी बाबत मार्गदर्शन,
कोव्हिड-19बाबतची सर्व कामे प्रभावी पणे राबविणे.
शा. पो.आ. रेकॉर्ड साहित्य आणि प्रभावी अंमलबजावणी करणे, शाळा सिद्धी रेकॉर्ड अद्ययावत करणे.
या बाबींवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
डॉ. जितेंद्र काठोळे
विषय सहाय्यक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अकोला जिल्हा-अकोला .
S.C.E.R.T. तज्ञ मार्गदर्शक
यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये सध्याच्या काळात उद्योग, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रांना कोव्हिड- 19 मुळे मोठे नुकसान झाले आहे. शिक्षण प्रक्रियेत सद्यस्थितीत उपचारात्मक शिक्षण उपक्रमांतर्गत ब्रिज कोर्स राबविणे आणि विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात अखंडित ठेवण्यासाठी महत्वाचा दुवा असल्याचे प्रतिपादन केले. हा कोर्स मागील इयत्तांच्या मुलभूत क्षमता आणि कृती, कौशल्य, मुलभूत ‌क्षमता, विद्यार्थी शैक्षणिक तयारी करणे यावर आधारित असल्याचे सांगितले.
नंतर शासनाने शैक्षणिक दिनदर्शिका तयार केलेली असून अध्ययन निष्पत्ती आधारित अभ्यासक्रम, कृतिपत्रिका आणि स्वाध्याय पुस्तिका नुसार ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती सांगितली.
शिक्षण परिषदेत अरण आणि उपळाई (बु) केंद्रातील उपक्रम शील मुख्याध्यापक श्री. विजय काळे, श्री. बालाजी ढेंबरे, नंदकिशोर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. गायकवाड, श्रीमती. वंदना खुणेने मॅडम यांनी राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली.
आभार श्री. शब्बीर तांबोळी यांनी व्यक्त केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button