Bollywood

Bollywood:Vikram Wedha: मुलाचं नाव राम ठेऊ शकत नाही…सैफ अली खानवर जुन्या व्हिडीओ मुळे संतापले नेटकरी..!पहा व्हिडीओ…!

Bollywood:Vikram Wedha: मुलाचं नाव राम ठेऊ शकत नाही…सैफ अली खानवर जुन्या व्हिडीओ मुळे संतापले नेटकरी..!पहा व्हिडीओ…!बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान सोशल मीडियावर काही ना काही कारणाने नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या चित्रपटांसंदर्भात केलेली वक्तव्य बरीच गाजली आहेत. लवकरच सैफ ‘विक्रम वेधा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपटाचा हिंदी रिमेक असून यात अभिनेता हृतिक रोशनचीही मुख्य भूमिका आहे. पण या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी सैफवर सोशल मीडियावरून खूप टीका होताना दिसतेय. त्याला बॉयकॉट करण्याची मागणी नेटकरी करत आहेत आणि याचं कारण म्हणजे त्याचा व्हायरल झालेला जुना व्हिडीओ…हृतिक रोशन आणि सैफ अली खान स्टारर ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यास आता अवघे तीन दिवस उरले आहेत, मात्र त्याआधीच बॉयकॉट गँग ट्विटरवर सक्रिय झाली आहे. गायत्री आणि पुष्करच्या दिग्दर्शनात बनलेल्या या सिनेमाचा पुन्हा एकदा सोशल मीडियावर निषेध सुरू झाला आहे. एवढंच नाही तर सैफ आणि करिनाचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एकीकडे सैफ म्हणत आहे की, तो आपल्या मुलाचे नाव राम ठेवू शकत नाही. सोबतच करीना आपला मुलगा तैमूरचे नाव घेऊन मुघल शासकांचे कौतुक करताना दिसत आहे. आता याबाबत युजर्सचा संतापही उफाळून आला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये सैफ अली खान म्हणत आहे की, ‘मी माझ्या मुलाचे नाव सिकंदर ठेवू शकत नाही आणि खरे तर त्याचे नाव रामही ठेवू शकत नाही. मी एखादे चांगले मुस्लीम नाव ठेवेन’ याशिवाय याच व्हिडिओमध्ये करीना कपूर एका शोमध्ये ‘तैमूरसारखा योद्धा’ असे म्हणताना दिसत आहे. करीना आपल्या मुलाचे नाव मोठ्या अभिमानाने घेताना दिसते. यावरून आता सैफला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.
दरम्यान हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांचा ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट ३० सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. त्याच्या दक्षिण चित्रपटाची हिंदी आवृत्ती आधीच OTT वर उपलब्ध आहे. विजय सेतुपती आणि आर माधवन यांनी दाक्षिणात्य ‘विक्रम वेधा’मध्ये जबरदस्त अभिनय केला. आता बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची टक्कर ‘पोन्नियिन सेल्वन’शी होणार आहे. ज्याचं दिग्दर्शन मणिरत्नम यांनी केलं आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button