Faijpur

फैजपूर प्रांत कार्यालयावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जोरदार निदर्शने

फैजपूर प्रांत कार्यालयावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जोरदार निदर्शने

सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल

फैजपूर : येथील री.पा.ई जिल्हा अध्यक्ष .राजुभाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात मा. ईश्वर इंगळे अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष व विकी भाऊ तायडे रावेर तालुका अध्यक्ष आणि आर.पी.आय यांच्या सह सर्व रिपाई कार्यकर्ते करण्यात आले*

रावेर तालुक्यातील प्रलंबित मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आले रावेर तालुक्यातील विवरे बुद्रुक गोदळी नेरूळ मोरगाव या गावांमधील अतिक्रमण धारक वर्षानुवर्ष वास्तव्य करून राहात आहे वास्तव्य करीत असलेल्या ठिकाणी त्यांना कोणतीही नागरे जात नाही नागरी सुविधा पुरविल्या जात नाहीत गटरी रस्ते आदी सुविधा नसल्याने सदर अतिक्रमण धारकांना घाणीच्या साम्राज्यात जीवन जगावे लागत आहे त्यामुळे त्यांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे जीवनमान उंचावण्याच्या ऐवजी शासन त्यांच्यावर अन्याय करत आहे.
शासनाचे 2022 पर्यंत सर्वांसाठी पक्के घरे असे धोरण राबवित असताना मात्र महसूल विभाग पंचायत समिती ग्रामपंचायत कार्यालय आधी अतिक्रमण धारकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे व त्यांना शासनाच्या धोरणापासून वंचित ठेवण्याचे काम करीत आहे.
तसेच विवरे खुद्रुक येथे यापूर्वी एकाच प्लॉटमध्ये अतिक्रमण धारकांना कायम करून घरकुलाचा सुद्धा लाभ दिला असताना मात्र आज रोजी त्या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या इतर गरजू अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण कायम करण्यास दिरंगाई केली जात आहे तरी याबाबत आपले आपल्या स्तरावरून चौकशी होऊन अतिक्रमण कायम करून त्वरित त्यांना घरकुलाचा लाभ द्यावा व त्या ठिकाणी नागरी सुविधा पुरवण्यात याव्या.
तसेच रावेर तालुक्यातील भोकरी येथील स्वस्त धान्य दुकानदार नागरिकांचे आर्थिक लूट करीत असून मनमानी पद्धतीने धान्य वाटप करीत आहे लाभार्थ्यांना पावती न देणे दुकानाबाहेर रेट न लावणे कमी प्रमाणात धान्य वितरित करणे कार्ड निहाय धान्य वाटप न करणे इत्यादी आर्थिक फायद्यांसाठी काम करीत आहेत
सदरील सर्व मागण्या पूर्ण न झाल्यास री.पा.ई तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल
आंदोलन कर्ते
मा.राजू भाऊ सूर्यवंशी ( जिल्हा अध्यक्ष)
मा.ईश्वर भाऊ इंगळे (अल्पसंख्याक जिल्हाअध्यक्ष)
मा.विक्की भाऊ तायडे (रावेर तालुका अध्यक्ष)
कमलाकर गाढे (रिपाइं तालुका सचिव)
लखन भाऊ इंगळे,विनोद मोरे.राजू तडवी,विष्णु पारधे,अक्षय गाढे,किरण सावळे,प्रदीप गाढे,किरण ढिवरे, भीमराव तायडे,हसन तडवी यांच्यासह कार्यकर्ते हजर होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button