Bollywood

Bollywood: ड्रामा क्वीन राखी सावंत करणार क्रिकेटर शी लग्न..!

Bollywood: ड्रामा क्वीन राखी सावंत करणार क्रिकेटर शी दुसरं लग्न..!

मुंबई ड्रामा क्वीन राखी सावंत नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असते. बिग बॉसच्या १५ व्या पर्वात तिने पती रितेशची ओळख करून दिली होती. या पर्वात राखी सावंतनं वाइल्ड कार्ड एंट्री केली होती. शोमधून बाहेर पडल्यानंतर अनेकदा दोघंही एकत्र दिसले. पण व्हॅलेंटाइन डेच्या अगोदर दोघंही वेगळे झाल्याचं समोर आलं. राखीनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक नोट शेअर करत याची माहिती दिली होती. पण रितेशपासून वेगळं झाल्यानंतर काही दिवसांनंतर आता राखी सावंतनं दुसरं लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एवढंच नाही तर तिला एका क्रिकेटरशी लग्न करायचं आहे असंही तिनं सांगितलं.

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत राखी सावंतनं तिच्या दुसऱ्या लग्नाचा प्लान शेअर केला. यासोबतच तिच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक समस्येसाठी ती स्वतःच जबाबदार असल्याचं तिनं म्हटलं आहे. राखी म्हणाली, ‘मी रितेशला बळजबरीनं किस केलं होतं. तो खूपच लाजरा आहे. त्यामुळे मी यात पुढाकार घेतला. माझ्या घटस्फोटासाठीही मी स्वतःच जबाबदार आहे. मी त्याला इथे बोलवलं होतं. तो खूप चांगला व्यक्ती आहे. या सर्व गोष्टींमध्ये त्याची काहीच चूक नाही.’

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button