Mumbai Diary: Dasara Melawa: शिवसेना झाली आक्रमक..हा घेतला मोठा निर्णय..!
मुंबई शिवसेनेमध्ये दोन गट निर्माण झाल्यामुळे दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गटही पुढे सरसावला आहे.मुंबई महापालिकेनं सु्द्धा याबद्दल निर्णय अजूनही पेंडिंग ठेवला आहे. त्यामुळे शिवसेनेनं आता हायकोर्टात जाण्याची तयारी सुरू केली आहे.
शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. तर शिंदे गटानेही दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क अर्थात शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई पालिकेकडे अर्ज केला आहे. मात्र, दसरा मेळाव्याकरता शिवाजी पार्क कुणाचं याचा निर्णय येत्या दोन दिवसांत होणार आहे. त्यामुळे आता शिवाजी पार्क मैदानासाठी शिवसेना कोर्टात जाणार आहे. दसरा मेळाव्या संदर्भात मुंबई हायकोर्टात दाद मागणार असून आजच याचिका दाखल करणार आहे. या याचिकेवर तातडीन सुनावणी घेण्याची विनंती शिवसेना करणार आहे.
दसरा मेळाव्याला परवानगी देण्यासाठी बीएमसी चालढकल करत असल्याचा आरोप सेनेनं केला आहे. प्रथम परवानगी मागूनही,परवानगी दिली नाही असा आक्षेप घेत जी वॉर्ड सहाय्यक आयुक्तांविरोधात याचिका दाखल करणार आहे.
दरम्यान, दसरा मेळावा कोण घेणार या मुद्द्यावरुन होणारं राजकारण आणि वाढता दबाव पहाता महापालिका निर्णयाकरता आणखी २ दिवस घेणार आहे. शांतता-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार असल्याने कोणत्याच गटाला परवानगी दिली जाऊ नये असं मत पालिका अधिकाऱ्यांच्या चर्चेत मांडले जात आहे.
दरम्यान, शिंदे गटाने बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मागितली होती. याबद्दल शिंदे गटाला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, शिंदे गटाने शिवतीर्थासाठी अर्ज दाखल केलेला आहे.







