Bollywood

Bollywood:देशी गर्ल प्रियंका निक सोबत नाही तर “ह्या”व्यक्ती बरोबर करणार होती विवाह..!

Bollywood:देशी गर्ल प्रियंका निक सोबत नाही तर “ह्या”व्यक्ती बरोबर करणार होती विवाह..!

मुंबई बॉलीवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी देशी गर्ल प्रियांका चोप्रा ही एक गुणी अभिनेत्री आहे.मिस वर्ल्ड झाल्यानंतर प्रियांकाने बॉलिवुडमध्ये एन्ट्री केली. त्यानंतर तिने अनेक हिट चित्रपट देखील दिले. प्रियांकाने तिच्या सैंदर्याने सर्वांनाच भूरळ पाडली आहे. त्यानंतर तिने हॉलिवूडमध्ये ही आपलं नशीब आजमावलं, तेथे देखील तिला चांगली संधी मिळाली. ज्यानंतर प्रियांकाने 2018 साली अमेरिकेतील सिंगर निक जोनसशी लग्न केलं आणि ती अमेरिकेत आता सेटल झाली आहे.

प्रियांकाच्या आयुष्यात आजच्या तारखेला कोणत्याही गोष्टीची कमी नाही. परंतु कदाचित एक खंत प्रियांकाच्या मनात कदाचित असावी. कारण तिने एका मुलाखतीत तिची इच्छा सांगितली होती, ज्यामध्ये तिला एका क्रिकेटरशी लग्न करायचे असल्याचे तिने सांगितले.

प्रियांकाचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने तिला टीम इंडियाच्या क्रिकेटरशी लग्ना करायचे असल्याचे सांगितले आहे.
हा व्हिडिओ 2000 सालचा आहे जेव्हा प्रियांकाने मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला होता. जिथे शाहरुख खान देखील जजच्या पॅनेलमध्ये समावेश करण्यात आला होता.
यामध्ये प्रियांकाला प्रश्न विचारताना शाहरुख म्हणाला की, ‘माझा प्रश्न थोडा काल्पनिक आहे, पण तुला कोणाशी लग्न करायला आवडेल?
शाहरुख खानने त्यासाठी प्रियांकाला तीन पर्याय दिले होते. तो म्हणाला की,”लग्नासाठी तु महान भारतीय खेळाडू अझहरसारख्या व्यक्तीची निवड करशील, जो तुला जगभरात घेऊन जाईल. ज्यावर तुला आणि देशाला अभिमान वाटेल. की तु स्वारोवस्की सारखा आर्टिस्टिक बिजनेसमॅनची निवड करशील जो तुझ्यासाठी दागिने आणि हार खरेदी करेल. की मग तु माझ्यासारखा एखादा हिंदी चित्रपट स्टार निवडाशील जो तुला इथे बसून काल्पनिक विवाहाशी संबंधित कठीण प्रश्न विचारेल.”
यावर प्रियांका उत्तर देताना म्हणाली, शाहरुख खान माझा क्रश आहे. पुढे प्रियांकाने सांगितले की, “मला भारतीय खेळाडू अझहरसोबत लग्न करायला आवडेल. माझा नवरा असा माणूस असेल ज्याच्यावर संपूर्ण देशाला अभिमान वाटेल.”
प्रियांका चोप्रा आणि शाहरुख खान यांनी ‘डॉन’ आणि ‘डॉन-2’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button