Dhule

कोवीळच्या नावाखाली,उपजिल्हा रुग्णालयात चालणारी रुग्णांची आर्थिक लुट थांबणार कधी? …..

कोवीडच्या नावाखाली,उपजिल्हा रुग्णालयात चालणारी रुग्णांची आर्थिक लुट थांबणार कधी? …..

मरता, क्या नही करता -अशा परिस्थितीत शासनाने वस्तुस्थितीचा अभ्यास करून कार्यवाही करावी. …

प्रतिनिधी/ असद खाटीक

दोंडाईचा – येथील उपजिल्हा रुग्णालयात कोवीड व सध्या निमोनिया ह्या आजाराखाली जे रूग्ण ऍडमिट केले जात आहे. त्या रूग्णांवर येथे सेवा देणारे महावैधकीय महाभाग आपली गावातील मेडीकलची दुकाने भरमसाठ चालवण्यासाठी रूग्णांना बाहेरून औषधे आणून बरे करण्याचे घाट धरत आमीष देत आहे, म्हणून रुग्णांचे नातेवाईकही ह्या बिकट परिस्थितीत पेशंट काॅटवर असल्यावर “मरता, क्या नही करता ” ह्या म्हणीचा साक्षात्कार अनुभव घेत ,देवाकडे याचना करत, आता असा सरकारी दवाखाना नको रे बाबा म्हणत फिर्याद करत आहे. म्हणून पैशाअभावी दाखल व्हायचे सरकारी दवाखान्यात व परिस्थितीचा फायदा घेत रूग्णांना महागडी औषधी बाहेरून आणायचे सांगत आर्थिक लुट करायची? असे हे किती दिवस चालेल. ह्या उद्भवलेल्या परिस्थितीचा कोणी वाली आहे का, नाही? असे एक ना अनेक प्रश्न दाखल झालेले रूग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना पडत आहे. म्हणून आता प्रशासनाने आहे त्या परिस्थितीचा अभ्यास करून दोषींवर कडक कार्यवाही करत शासकीय सेवेतून बडतर्फ करत त्यानंतर ही खाजगी व्यवसाय करण्यास मनाई करायला पाहिजे, अशी मागणी जनतेत जोर धरत आहे.

आज देशात व देशातील गल्लो गल्लीत करोनाने डोके वर काढले आहे. सरकार सर्वसामान्य जनतेचे ह्या आजारापासुन जीव वाचवण्यासाठी मागील सात महिन्यांपासून सर्वतोपरी प्रयत्न करत, बेहिशोबी पैसा खर्च करत आहे. त्यासाठी त्यांनी सर्व जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयातील सरकारी हॉस्पीटलमध्ये बेडची व्यवस्था, विलगीकरण कक्ष, स्वच्छता, ऑक्सिजन पुरवण्यापासुन, ईम्युनिटी पावर वाढवणाऱ्या टॅबलेट, सकस आहार यासह इतर इतंभुत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र तरीही करोना आजाराची भिती दाखवुन गोर-गरीब जनतेची लुट करायची काही महावैधकीयभागांकडून आजही सुरू आहे. म्हणून गोर -गरिब जनतेने सरकारी रूग्णालयात उपचार करून घ्यायचा का? रोजच्या वैद्यकीय विभागाच्या, स्टाॅपच्या त्रासाच्या तक्रारी करायच्या ह्या द्विधा मनस्थितीत रूग्ण व त्याचे नातेवाईक वावरत आहेत. म्हणजे आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यावरच व्यक्ती सरकारी रूग्णालयात भरती होतात, की इथे कमी खर्चात आपला ईलाज होईल.

मात्र गरिबांच्या ह्या परिस्थितीचा डोळा ठेवून टाकत उभे राहणारे गावातीलच पण सरकारी रूग्णालयात नोकरी म्हणून काम करणारे, एकीकडे सरकारकडून गलेलठ्ठ पगार घेतात व दुसरीकडे गोर-गरीब रुग्णांच्या परिस्थितीचा फायदा घेत कधी कधी उपचारासाठी सरकारी रूग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांना, इथे तुमच्या आजारांवर योग्य उपचार केला जाणार नाही . म्हणून तुम्ही माझ्या खाजगी हॉस्पीटलला दाखल व्हा, असे सांगणारे बोलके चित्र अनेकवेळा उपजिल्हा रुग्णालयात पहायला मिळाले आहे . मात्र ह्या करोना काळात काहींना हा अचानक पैसे देणारा देव यमदुत वाटू लागला. म्हणून अनेकांनी आपली खाजगी दुकाने बंद ठेवली. तर काहींनी हात न लावता लाबूंनच विचारपूस करत उपचार करायचे चालू ठेवले. तर काहींनी दुसरी तरकीब लावत, आजही दाखल झालेल्या रूग्णांनपेक्षा त्यांची आर्थिक परिस्थिती समजून घेत, कमी वेळात आपण चांगला ईलाज करू शकतो. पण येथे अमुक अमुक औषधी उपलब्ध नाही आहेत.

म्हणून आपण जर माझ्या खाजगी हॉस्पिटलमधील मेडिकल स्टोर्समधुन अमुक अमुक कंपनीची इंजेक्शन, टॅबलेट आणल्या तर मी लवकर तुमचा पेशंट बरा करू शकतो असे आमीष, भांबावून गेलेल्या पेशंटला व त्याच्या नातेवाईकाला दिले जाते. तसेच अमुक अमुक कंपनीची औषधे माझ्या खाजगी हॉस्पीटललाच मिळेल,त्याचाच गुण पेशंटला लागेल. दुसरीकडून आणता कामा नये असाही घाट पेशंटच्या नातेवाईकाला घालण्यात येतो. म्हणून “मरता -क्या नही करता ” ह्या म्हणीचा साक्षात्कार अनेकांना येथे येत आहेत. आता उद्भवलेल्या , आहे त्या परिस्थितीवर शासनाने अभ्यास करून जनतेची आर्थिक फसगत थांबवावी असे मत गावातील सुज्ञ नागरिकांतून व्यक्त केले जात आहे.

वरील सत्य परिस्थितीला अनुषंगून गावातील निडर व्यक्तिमत्त्व श्री प्रफुल्ल धोंडू साळुंखे यांनी आमच्या “जनमत -टुडे” च्या कार्यालयात येऊन, वडीलांना कोवीळच्या संदर्भात दाखल केल्यावर आलेल्या विविध अडचणी व आर्थिक आपबिती सांगितली. तसेच दोंडाईचा उपजिल्हा रूग्णालयात असलेल्या असुविधा, स्वच्छतेचा अभाव, स्टॉपची अरेरावी, मनमानी, व तेथे गोळ्या, इंजेक्शनच्या नावावर रुग्णांची होत असलेली आर्थिक पिळवणूकची सविस्तर तक्रार त्यांनी मा. जिल्हाधिकारी सो, धुळे. मा. जिल्हाचिकीत्सक सो, धुळे. मा. वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रूग्णालय, दोंडाईचा. मा. आमदार श्री जयकुमारजी रावल व दोंडाईचा कोवीळ-१९ चे प्रमुख तथा अप्पर तहसीलदार सो, दोंडाईचा यांना सविस्तर घटनाक्रम देवून कार्यवाहीची मागणी केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button