Bollywood

Bollywood: वय 16..व्यवसाय वेश्या…!वेश्यांच्या हक्कांसाठी भिडली थेट पंडित नेहरू यांना…! निमित्त आलिया भट अभिनित गंगुबाई कठियावाडी चित्रपटाचं…!

Bollywood: वय 16..व्यवसाय वेश्या…!वेश्यांच्या हक्कांसाठी भिडली थेट पंडित नेहरू यांना…! निमित्त आलिया भट अभिनित गंगुबाई कठियावाडी चित्रपटाचं… थेट नेहरूंनाच विचारला प्रश्न…मग तुम्ही माझ्याशी लग्न कराल का..?

मुंबई गंगूबाई काठियावाडी हा आगामी हिंदी भाषेतील चरित्रात्मक गुन्हेगारी-नाटक शैलीतील चित्रपट प्रदर्शित होत आहे.संजय लीला भन्सालीनी दिग्दर्शित केला असून जयंतीलाल गाडा आणि संजय लीला भन्साळी निर्मित आहे.या चित्रपटात मुख्य भूमिकेत आलिया भट्ट, विजय राज, इंदिरा तिवारी आणि सीमा पाहवा यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.अजय देवगण आणि इमरान हाश्मी या चित्रपटात विस्तृत भूमिका घेत आहेत. हा चित्रपट १८ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

गंगुबाई कठियावाडी यांच्या जीवनावर हा चित्रपट असून गंगुबाई ची मुख्य भूमिका आलिया भट साकारत आहे.हया चित्रपटाचा प्रोमो रिलीज झाला असून ह्यावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

कोण होती गंगुबाई..?

वयाच्या १६ व्या वर्षी वेश्या वस्तीत फसली गेली… जिने बेधडकपणे एका डाॅनच्या घरात घुसून त्याला राखी बांधली… जिचा फोटो प्रत्येक वेश्या महिलेच्या घरात आहे… वेश्यांच्या हक्कांसाठी पंतप्रधान नेहरूंना थेट भिडली…60 च्या दशकातील एक डॉन माफिया क्वीन, बिजीनेस वूमन ती डेरिंगबाज गंगूबाई काठियावाडी आहे तरी कोण, जाणून घेऊया…

गुजरातमधील काठियावाड या गावात राहणारी गंगूबाईचं संपूर्ण नाव गंगा हरजीवनदास काठियावाडी असं होतं. तिने खूप शिकावं, असं गंगूबाईच्या आई-वडिलांना वाटत होतं. पण, तिचं मन पुस्तकांत नव्हे तर मुंबईच्या फिल्मीविश्वात रमत होतं.वडिलांकडे हिशोब पाहणारा रमणिक बरोबर त्यांचं प्रेम होतं. पण याला तिच्या आई-वडिलांचा विरोध होता. म्हणून दोघांनी पळून जाऊन लग्न केलं आणि दोघांनी थेट मुंबई गाठली. काही दिवस ते दोघं एकत्र राहिले. एके दिवशी रमणीकने गंगाला सांगितलं की मी आपल्यासाठी घर पाहून येतो. तू माझ्या मावशीच्या घरी रहा. रमणीकने मावशीबरोबर गंगाला एका टॅक्सीमध्ये बसवलं आणि कायमचाच निघून गेला.
ती टॅक्सी मावशीच्या घरी नाही तर थेट कामाठीपुरात पोहोचली. खरंतर रमणीकने गंगुशी गद्दारी करून तिला केवळ ५०० वेश्या व्यवसायात विकलेली होती. कामाठीपुरा पाहून ती गडबडली, गोंधळली, किंचाळली. पण, शेवटी तिने परिस्थितीशी तडजोड केली. ती इच्छा असूनही काठियावाड येथे जाऊ शकली नाही.

सेक्सचा आनंद घेण्यासाठी आलेल्या शौकत खानने गंगूबाईवर अत्याचार केले. शौकत हा मुंबईचा कुख्यात डाॅन करीमलालाचा सहकारी होता. गंगूबाईने शौकतचा पत्ता शोधून काढला आणि करीमलालाच्या घरी पोहोचली आणि तिने सर्व परिस्थिती सांगितली. करीमलालाने तिला विश्वास दिला की, “तू निर्धास्त रहा. परत तो तुझ्याकडे आला तर मला कळवं.
गंगूबाईने करीमलाला भाऊ मानत त्याच्या हातावर राखी बांधली. पुढच्या वेळी शौकत गंगूबाईजवळ आला. तिने करीमलालाला कळवलं. करीमलाला लगेच कमाठीपुरात गाठलं आणि शौकत खानला सर्वांसमोर धू धू धुतला… त्याने सर्वांना सांगितलं की,गंगूबाई ही माझी बहीण आहे. कुणी हात लावला तर याद राखा.”
गंगाचा भाऊ डाॅन करीमलाला आहे म्हटल्यावर तिचा कामाठीपुरात पुरता दबदबा निर्माण झाला. त्यानं तिने कामाठीपुराच्या निवडणुकीत भाग घेऊन निवडून आली. त्यानंतर तिने वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या हक्कांसाठी लढाई सुरू केली. ज्या मुलींना फसवून या व्यवसायात आणलं गेलं, त्या सोडवून त्यांच्या घरी सुरक्षित पोहोचविण्यात आलं. आपल्या कामामुळे गंगूबाई जास्तच प्रसिद्ध झाली.

तुम्ही माझ्याशी लग्न करा..मी वेश्या व्यवसाय सोडते..!थेट नेहरूंना केला प्रश्न…!

कामाठीपुरात वेश्या व्यवसायात महिलांचं पोटपाणी चाललं होतं. पण, तोच कामाठीपुरा बंद करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले तेव्हा गंगूबाई काठियावाडी थेट पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांच्यासमोर बेधडकपणे सर्व प्रश्न मांडले. त्यावेळी नेहरू म्हणाले हे काम सोडा यावर गंगुबाई नी तुम्ही माझ्याशी लग्न कराल का..?तर मी हे काम सोडते..! अस विचारताच नेहरू निरुत्तर झाले. अशाप्रकारे तिने कामाठीपुरा आणि तिथल्या महिलांच्या पोटापाण्यावर आलेलं बालंट बाजूला केलं.

तिच्या कार्यकर्तृत्वामुळे गंगाबाई काठियावाडीला प्रत्येक वेश्या महिलेच्या घरात आदराने पाहिलं जाऊ लागलं. ती सर्वांची आई झाली. आजही कामाठीपुऱ्यात तिचा पुतळा आहे. तिथल्या महिला मनोभावे पुजतात. अशी ही गंगूबाई आणि तिचं कर्तृत्व लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी संजय लिला भन्साळी यांचा ‘गंगूबाई काठियावाडी’ नावाचा सिनेमा येतो आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button