Manchar

चेतन बेढांरी सर यांचा मंचर मध्ये वाढदिवस साजरा

चेतन बेढांरी सर यांचा मंचर मध्ये वाढदिवस साजरा

मंचर / प्रतिनिधी – संतोष गवारी

आंबेगाव तालुका स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने आंबेगाव तालुक्यातील आदर्श व्यक्तिमत्व चेतन बेढांरी सर यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक वृंद मंचर येथे साजरा करण्यात आला.
चेतन बेंढारी सर यांनी आजपर्यंत खूप विद्यार्थी घडवले त्यामध्ये प्रथम तिरपाड भागातील नोकरी करत होते अनेक विद्यार्थी त्यांच्या हाताखाली शिकलेले नोकरीला लागले. आदिवासी बांधवांचे प्रेम व मने जिंकली ते आज मंचर याठिकाणी राहत असताना अनेक जिल्हा परिषद शाळेमध्ये काम करण्याची संधी मिळाली असताना तालुक्यातील अनेक वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची बदली झाली मात्र ज्या ज्या ठिकाणी त्यांनी जिल्हा परिषद शाळेमध्ये ज्ञानदानाचे काम केले त्या ठिकाणी त्यांचं नामोल्लेख हा तसाच राहिला आहे व त्यांचे काम हे विद्यार्थ्यांसाठी मोलाचा ठरले आहे.

शैक्षणिक काम करत असताना सामाजिक बांधिलकी म्हणून सामाजिक कामात मोठा सहभाग असतो. त्यामुळे आज चेतन बेढांरी सर यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी व शुभेच्छा देण्यासाठी शिक्षक मित्र मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यावेळी आंबेगाव तालुक्यातील शिक्षक नेते सुरेश लोहकरे सर, आंबेगाव तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष ठकसेन गवारी, सरचिटणीस राजेंद्र शेळकंदे सर, जिल्हा प्रतिनिधी मधुकर भारमळ सर, सखाराम वाजे सर, राज्य कार्यकारिणी सदस्य संतोष गवारी सर संजय घोटेकर, संतोष राक्षे, कोषाध्यक्ष अरविंद मोढवे, प्रकाश गोफणे, मनोज सरदार, रोहिदास गवारी, राजू बेंढारी, चंद्रकांत मडके व आंबेगाव तालुका स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक समितीचे सभासद आदी नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Back to top button