Manchar

यश हे प्रयत्नांना चिकटलेले असते : मनोहर मोहरे

यश हे प्रयत्नांना चिकटलेले असते : मनोहर मोहरे

मंचर / प्रतिनिधी – दिलीप आंबवणे

नारोडी ( ता. आंबेगाव ) येथील मुक्तांगण या मुलींच्या निवासी वसतीगृहात आयोजित ‘लेखक आपल्या भेटीला ‘ या उपक्रमात कवी व लेखक मनोहर मोहरे यांनी विद्यार्थीनींना मार्गदर्शन करताना वरील मत व्यक्त केले .
नारोडी येथे महाराष्ट्र आरोग्य मंडळ संचालित आदिवासी , अनाथ व दूर्गम भागातील गोरगरीब मुलींसाठी १९८८ पासून वसतीगृह चालविले जाते . येथे इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतच्या एकूण ८५ मुली शिक्षणाचे धडे गिरवतात . शालेय शिक्षणाबरोबरच कौशल्य विकास , शिलाई मशिन कोर्स , संगणक शिक्षण ,योगासने, विविध वस्तु बनवणे , व्यक्तिमत्व विकास आणि शेतीचे शिक्षण येथे दिले जाते .

यश हे प्रयत्नांना चिकटलेले असते : मनोहर मोहरेसंस्थेमार्फत मुलींना सकस आहार , लेखन साहीत्य , पाठ्यपुस्तके मोफत पुरविली जातात . त्याचबरोबर सांस्कृतिक, स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा , वक्तृत्त्व , मेहंदी , रांगोळी , क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून त्यांचा सर्वांगिण विकास साधला जातो . अनेक विद्याथीनींनी विविध स्पर्धांमधे बक्षीसे मिळवली आहेत .
मोहरे म्हणाले , विद्यार्थीनींनी स्वतःचे ध्येय ठरवले पाहीजे . त्यासाठी काय , कसे , कधी याचे व अभ्यासाचे वेळापत्रक बनविले पाहिजे . यश हे तुमची परिस्थिती बघत नाही , ते कष्टाला महत्व देते . म्हणून प्रत्येकाने प्रयत्न केले पाहीजेत . अपयशाने खचून न जाता उभारी घेतली पाहिजे . अनेक प्रेरणादायी उदाहरणे व दृष्टांन्त देऊन त्यांनी शिक्षणाचे महत्त्व विशद केले .
त्याचप्रमाणे कविता आणि लेख लिहीण्याच्या सोप्या टीप्स सांगितल्या . येथील निवडक विद्यार्थिनींचा प्रातिनिधिक कविता संग्रह बनविण्याचा मनोदय मोहरे यांनी व्यक्त केला . याला विद्यार्थीनींनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला .
यावेळी शिक्षक , ग्रामस्त, विद्यार्थीनी व संस्थेचे कर्मचारी हजर होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यवस्थापिका अश्विनी चव्हाण यांनी तर विद्यार्थीनी अक्षदा पोटे हीने सूत्रसंचलन केले . वैष्णवी भारमळ हिने आभार मानले .

Leave a Reply

Back to top button