Manchar

शिक्षण घेऊन मोठे आधिकारी व्हा – बिरसा क्रांती दल राज्य सचिव डी. बी.घोडे, नारोडी वस्तीगृहला सदिच्छा भेट

शिक्षण घेऊन मोठे आधिकारी व्हा – बिरसा क्रांती दल राज्य सचिव डी. बी.घोडे, नारोडी वस्तीगृहला सदिच्छा भेट

मंंचर /प्रतिनिधी – अभिजीत भालचिम

मुक्तांगण वस्तीगृह नारोडी येथे बिरसा क्रांती दलाच्या पुणे जिल्हा वतीने बैठक घेतली. त्यावेळी बिरसा क्रांती दल राज्य सचिव डी बी घोडे, पुणे विभागीय अध्यक्ष दिलीप आंबवणे, बाळासाहेब बेंढारी, नामदेव घोईरत, तळपे बाई, फसाबाई घोईरत, इंदूबाई घोडे आदी विद्यार्थ्यांनी उपस्थित होत्या.

आदिवासी समाजातील ८४ मुली ५ वी ते ११ वी शिक्षणासाठी आहेत. मुलींचे वस्तीगृहामध्ये स्वच्छता होती. परिसरात झाडे लावली आहेत. मुलींना सौरऊर्जावर गरम पाणी आघोळी साठी असते. चांगले जेवण मिळते असे मुलींनी सांगितले. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत सर्व दिनक्रम सविस्तर माहिती दिली.
डी. बी. घोडे म्हणाले, तुम्ही येथे शिक्षण घेण्यासाठी आले आहात तर मनलावून शिकले पाहिजे. शिक्षण घेऊन मोठे आधिकारी झाले पाहिजे. तुमचे आईवडील शेतात खुप कष्ट घेतात. त्यांना तुम्ही चांगले टक्के पाडुन दाखवा. तुम्ही घरी गेल्यावर आईवडील यांना रोज सकाळी नमस्कार करत जा. तुम्हाला काही अडचण असेल तर तात्काळ मला संपर्क करा.
आंबवणे म्हणाले, तुम्ही अभ्यासकडे लक्ष द्या. अभ्यास बरोबर रोजचे दैनिक पेपर वाचणे. व्यायाम करणे, दोर उडी मारणे, योगा करणे, डान्स मध्ये सहभाग घेणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, डॉ गोंविद गारे, बिरसा मुंडा, अण्णाभाऊ साठे अशा महामानवाची पुस्तके वाचली पाहिजेत. या महामानवावर भाषण करता आले पाहिजे. तुम्हाला कोणी त्रास दिला तर तात्काळ आपल्या जवळच्या सरांना बाईंनी सांगितला पाहिजे. कोणी तुम्हाला आदिवासी म्हणून जातीवाचक बोलले तर त्या व्यक्तीला सुट्टी देयाची नाही. आता थोडे दिवस राहिले आहे परिक्षा तोंडावर आली आहे अभ्यासमध्ये लक्ष द्या.
घोडे मँडम म्हणाल्या, मुलींना भेटल्यामुळे त्यांना आपल्या घरची मंडळी भेटायला आल्यासारखे मनमोकळे झाले. मुलींना बरे वाटले.

Leave a Reply

Back to top button