Mumbai

बापरे..!शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण..!

बापरे..!शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण..!

मुंबई घणसोली येथील शेतकरी विद्यालयातील १६ विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या दोन दिवसांच्या काळातील ही संख्या आहे. या शाळेतील आणखी ६०० विद्यार्थ्यांची करोना चाचणी करण्यात येणार असून या स्थितीमुळे शाळा आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
लागण झालेले हे विद्यार्थी ८ ते १२ या वयोगटातील आहेत. आज एकूण ३७५ विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात आली. यात १६ विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आणि एकच खळबळ उडाली.

या शाळेत परदेशातून आलल्या एका व्यक्तीच्या नातेवाईकाचा मुलगा शिकत आहे. शंका आल्याने त्याची करोना चाचणी करण्यात आली. त्याची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर या शाळेतील विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात आली. त्यात हे विद्यार्थी करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता

आज एकूण १६ विद्यार्थ्यांची आरटीपीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर शाळेत आणि विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये मोठे चिंतेचे वातावरण पसरले आहे. आता आज ६०० जणांची चाचणी करण्यात येणार आहे. या चाचणीचे रिपोर्ट काय येतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

राज्यात शुक्रवारी ओमिक्रॉनच्या ८ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. यांपैकी ६ रुग्ण पुण्यात आढळले असून मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीत प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे. या बरोबरच राज्यातील एकूण ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या ४० वर पोहोचली आहे.

राज्यात शुक्रवारी करोनाच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ झाली असून एकूण ९०२ रुग्णांचे निदान झाले आहे. तर दिवसभरात ६८० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच दिवसभरात १२ रुग्णांचा मृत्यू झाल्याचीमाहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button