Surgana

सुरगाणा तालुक्यातील आदिवासी बांधवांना आमदार नितीन अर्जुन (ए.टी.) पवार यांचा मदतीचा हात

सुरगाणा तालुक्यातील आदिवासी बांधवांना आमदार नितीन अर्जुन (ए.टी.) पवार यांचा मदतीचा हात

प्रतिनिधी दीपक भोये

मनखेड: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन केल्यानंतर हातावर पोट असणाऱ्यांचे हाल झाले आहेत. सुरगाणा तालुक्यांतील असे अनेक मोलमजुरी करून पोट भरणारे कामगारासमोर येणारे दिवस कसे ढकलायचे? यांचा हा मोठा प्रश्न आहे. ज्यांना एक वेळच्या जेवणाची व्यवस्था नाही. हातावर पोट असलेल्या अल्प भूधारक शेतकरी, मजूर, रोजंदारी मजूर, घरकाम करणाऱ्या महिला, बांधकाम करणारे कामगार शेजारील तालुक्यात उद्दर निर्वाह करण्यासाठी विशेषता कळवण, दिंडोरी, निफाड, नाशिक या तालुक्यामध्ये द्राक्षबागेचे कामाला हे कुटुब कामाला होते. लॉकडाऊन झाले असे कळताच कसे बसे लोक स्वत:चा जीव मुठीत घेऊन घरी परतले आहेत. आज गावात कुठल्याही प्रकारचा रोजगार उपलब्ध नाही. अशा कुटुंबावर मोठं संकट आल आहे. यांच्यावर उपासमारीची वेळ नये म्हणुन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजू पवार यांनी अशा 680 गरजूंना 10 ते 12 दिवस पुरेल एवढे किराणा सामान कृतज्ञता म्हणुन मोफत वाटप करण्यात आले.सुरगाणा तालुक्यातील भवाडा गटातील उंबरदे, पळसन, पळशेत, पिपळशोंड, रानपाडा, ठाणगाव, गूरटेबी, सांबरखल, दाबाडमाळ, जायविहिर या गावात वाटप करण्यात आले व गावात जाऊन गरीब गरजू लोकांची निवडक एक यादी बनवण्यात आली असून कोणालाही यासाठी घराबाहेर जावे लागणार नसून शासकीय नियमांचे पालन करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने त्यांना घरपोच हे शिधा सामान दिले जात आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे.

परंतु ज्या गरिबांचे निव्वळ हातावर पोट आहे, अशा लोकांवर या काळात उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून. आशा संकटाचे वेळी धाऊन आले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू पवार यांच्या संकल्पनतून गरीब गरजू 680 लोकांची यादी करून आमदारांकडून मदतीचा हात देण्यात आला आहे. या उपक्रमाचं सगळी सर्व स्थरातून समाधान व्यक्त करीत आहे. यामध्ये प्रामुख्याने तांदूळ, साखर मुगडाळ, तूरडाळ, उडिद, दाळ, तेल, साबण मीठ असे साधारण 10 ते12 दिवस पुरेल एवढे किराणा सामान मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी तालुका अध्यक्ष राजू पवार, गोपाळ धूम, वाघमारे (सरपंच भवाडा), युवराज लोखंडे, खंडू वाघमारे, भास्कर आलबाड, चंद्रकांत गायकवाड, सचिन महाले, रोहन पाडवी, प्रकाश धूम, किरण वाघमारे, प्रसराम कामडी, पुंडलिक खांबाईत, धर्मा शेट पाडवी, हंसराज भोये, रवींद्र पाडवी, हेमराज धूम, कृष्णा चौधरी, दामू गवळी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button