Pune

बाल आनंद मेळावा – उत्साहात संपन्न पि चि मनपा शाळा क्रमांक 37 मुले दापोडी

बाल आनंद मेळावा – उत्साहात संपन्न पि चि मनपा शाळा क्रमांक 37 मुले दापोडी पुणे

पुणे प्रतिनिधी:-लक्ष्मण कांबळे

आज दिनांक ता६जानेवारी2023 रोजी ” बाल आनंद मेळावा पि, चि मनपा शाळा क्रमांक 37 मुले दापोडी येथे 2023″ रोजी खरी कमाई बाजार हा उपक्रम अतिशय उत्साहात पार पडला.यावेळी बाल आनंद मेळाव्यात विध्यार्थ्यांनी योगा प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले होते.या उपक्रमामध्ये मध्ये विध्यार्थीनी घरी बनवून आणलेल्या
विविध पाककृती पदार्थ भाजीपाला, स्टेशनरी,फळे सौंदर्य प्रसाधने साहित्य
यांची तीस ते चाळीस दुकाने मांडण्यात आली होती. विध्यार्थ्यानी उत्सुर्फतपणे दुकाने लावून आपल्या मालाची विक्री केली.
या मेळाव्यासाठी शाळेतील सर्व विध्यार्थ्यांचे पालक, मुख्यापक, शिक्षक तसेच शाळेतील सर्व शिक्षक व विध्यार्थी यांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली.विशेष करून या बाल आनंद मेळाव्यात पालक व माता मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या पाल्याचा आनंद द्विगुणित केला.
हा उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी आदरणीय पालक वर्ग ,शाळेतील सर्व शिक्षक वृंद व विध्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. असे यावेळी पि, चि मनपा शाळा क्रमांक 37 मुले शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षण वृंद यांनी विध्यार्थ्यांच्या पालकाचे आभार मानले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button