Mumbai

हद्दच झाली बाई कंगना..!थेट न्यायाधीश बदलण्याची केली मागणी..!केले गंभीर आरोप..!

हद्दच झाली बाई कंगना..!थेट न्यायाधीश बदलण्याची केली मागणी..!केले गंभीर आरोप..!

मुंबई काही दिवसांपासून लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानी प्रकरणी अभिनेत्री कंगना रनौत आज अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात हजर राहिली. या संदर्भात ती आज उपस्थित राहिली नसती तर तिला अटक वॉरंट सोडले जाईल असा न्यायालयाने इशारा दिला होता.आज न्यायालयात उपस्थित राहिल्यानंतर कोर्टाने पुढील सुनावणीची तारीख 15 नोव्हेंबर ही दिली आहे.

दरम्यान आजच्या सुनावणीनंतर कंगना रणावतने न्यायाधीश बदलण्याची मागणी केली आहे. अंधेरी कोर्टातील न्यायाधीशांवर कंगनाने आरोप करत न्यायाधीश बदलण्यात यावेत अशी थेट मागणी केली आहे. हा खटला रद्द करावा अशी याचिका कंगनाने दाखल केली होती पण मुंबई उच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावली होती.

आजच्या सुनावणीत कंगना कोर्टापुढे हजर झाली नाही तर तिच्या नावे अटक वॉरंट जारी केला जाईल, अशी तंबी दंडाधिकारी न्यायालयाने कंगनाला दिली होती. या खटल्याविरोधात कंगनानं दाखल केलेली याचिका नुकतीत मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली होती. तसेच दंडाधिकारी न्यायालयाची कारवाई योग्य असल्याचा निर्वाळाही दिला होता. त्यामुळे आजच्या सुनावणीत कंगनाला दंडाधिकारी न्यायालयात हजर रहाणं बंधनकारक होतं.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button