आटपाडी

ग्रंथालयशास्त्र क्षेत्रातील यशस्वी ग्रंथपाल व विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न…

ग्रंथालयशास्त्र क्षेत्रातील यशस्वी ग्रंथपाल व विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न…

राहुल खरात

आटपाडी प्रतिनिधी :
सांगली येथील राजमती नेमगोंडा पाटील कन्या महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठ संचलित ग्रथालय आणि माहितीशास्त्र पदवी व निष्णात अभ्यासक्रम यांच्यामार्फत ग्रथालयशास्त्र क्षेत्रातील यशस्वी ग्रंथपाल व विद्यार्थांचा सत्कार करण्यात आले. निवृत्त ग्रथालय संचालक डॉ. नागेश काम्बले यांच्या हस्ते व प्रा. ए.ए. मासुले, प्रा.डॉ. एस.ए.एन. इनामदार यांच्या प्रमुख उपस्थीत होते. अध्य़क्षस्थानी डॉ. अपर्णा कुलकर्णी होत्या.
यावेळी एन.डी. पाटील नाईट कॉलेजचे निवृत्त ग्रंथपाल प्रा. एन.डी. तडसरे यांचा निवृत्तीनिमित, डॉ. विकास खराडे, डॉ. गणेश खांडेकर, डॉ. चंदनशिवे यांचा पी.एच.डी. झालेबद्दल तर प्रा. मनिषा पाटील, प्रा. तृप्ती शहा, प्रा. संध्या कुलकर्णी यांचा सेट परिक्षा उत्तीर्ण झालेबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. काम्बले, प्रा. मासुले, डॉ. इनामदार, प्रा. खांडेकर, प्रा. खराडे, प्रा. शहा यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक प्रा. ए.ए.मासुले यांनी केले. सूत्रसंचालन यु.बी. करसाळे यांनी केले. आभार प्रा. युवराज पाटील यांनी मानले.
फोटो ओळ- सांगली येथे प्रा.एन.डी.तडसरे यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार करताना डॉ. नागेश काम्बले, प्रा.ए.ए. मासुले, डॉ. अपर्णा कुलकर्णी आदी.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button