सोलापूर

ग्रामीण भागातील महिलांनी आर्थिक सक्षम बनले पाहिजे- विद्या भागरे- भोसले

ग्रामीण भागातील महिलांनी आर्थिक सक्षम बनले पाहिजे- विद्या भागरे- भोसले

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद आणि कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, नळदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमांतर्गत “ग्रामस्वच्छता व जलव्यवस्थापनासाठी युवा” हि संकल्पना घेऊन विशेष वार्षिक शिबीर ” रामतीर्थ तांडा येथे सुरू आहे आजच्या सत्रात महिला मेळावा संपन्न झाला . या मेळाव्यात मा. सौ विद्या भगरे भोसले आणि सौ अरुणा साळुंखे यांनी महिलांविषयी सखोल असे मार्गदर्शन करताना अनेक विषयाला स्पर्श करीत महिलां विषयी अनमोल विचार मांडले . तर माजी प्रा इंदुमती भोरे मॅडम यांनी सुंदर कविता सादर करून अध्यक्षीय समारोप केला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगीता मोरे मॅडम यांनी केले . पाहुण्यांचा परिचय डॉ. सुलभा कोरेकर मॅडम यांनी करून दिला. यावेळी ऋतुजा सालगे, सोनाली ठाकूर, प्रियंका भोई, दिव्या माने, कुमारी वाघमारे या विद्यार्थिनींनी ही आपले मनोगत व्यक्त केली. त्याचबरोबर डॉ. महिंद्रकर मॅडम यांनीही आपले विचार मांडले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रासेयोच्या स्वयंसेविका कु. नम्रता नकाते व पंचशिला गायकवाड यांनी केले तर आभार कु. शितल कलशेट्टी यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाधिकारी प्रा . लता डोणे, प्रा.पूजा पाटील, प्रा. कु. पवार मॅडम, प्रा. कविता कांबळे, डॉ. लक्ष्मी मनशेट्टी तसेच रासेयोचे कार्यक्रमाधिकारी डॉ. हंसराज जाधव, प्रा. आशिष हंगरगेकर, प्रा. विवेकानंद कुंभार, डॉ. संतोष पवार यांच्यासह स्वयंसेवक आणि गावातील महिला ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button