Kolhapur

अभिनयातून सामाजिक बांधिलकी जपणारे शिक्षक अवधूत पोतदार.

अभिनयातून सामाजिक बांधिलकी जपणारे शिक्षक अवधूत पोतदार.

सुभाष भोसले -कोल्हापूर
अवधूत रमेश पोतदार हे कोल्हापूर जिल्हयातील कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली विद्यालय ज्युनि,कॉलेज,सिद्धनेर्ली येथे कलाअध्यापक असून त्यांची माणुसकीची शिकवण देणारी तुकडा ही शॉर्ट फिल्म प्रेक्षकासाठी सादर झाली आहे .अवधूत पोतदार यांनी महाराजा शंभू छत्रपति प्रॉडक्शन निर्मित ऐतिहासिक महानाटय शिवपुत्र संभाजी या नाटकात विद्यमान खासदार डॉ अमोल कोल्हे सोबत संताजी घोरपडे यांची भूमिका सादर केली तसेच ते दिग्ददर्शन व रोलही निभावतात त्याचबरोबर हरवत चाललेेली आई या विषयावर त्यांनी शॉर्ट फिल्म तयार केली आहे. तसेच हिंदी सिरीयल सात रंग के सपने या हिंदी सिरीयल चे प्रोमो नुकतेच लाँचिक जत चे तहसीलदार सचिन पाटील यांच्या हस्ते नुकतेच प्रतीक सिनेमा गृहात फित कापून करणेत आले.

तसेच दिंडी सोहळा,फुगडी ,मृददंग वदन,ढोलकी याची त्यांना आवड आहे.बहुआयामी व्यक्तीमत्व असलेले कलाशिक्षक अवधूत पोतदार सामाजिक जाणीवेतून हे सर्वं कार्य करत आहेत.त्यांना संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत समरजितसिंहराजे घाटगेसो,सेक्रेटरी एन के मगदूम प्रशासन अधिकारी कर्नल मंडलिक यांचे प्रोत्साहन मुख्याध्यापिका आर ए मगदूम,ए पी सारंग यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यांच्यावर संस्थेचे पदाधिकारी शिक्षकवृंद ,आजी माजी विदयार्थी यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button