Amalner

जप्त केलेल्या अवैध गौण खनिज वाहनांचा लिलाव..!तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी केले आवाहन..!

जप्त केलेल्या अवैध गौण खनिज वाहनांचा लिलाव..

अमळनेर येथील अवैध रित्या गौण खनिज वाहतूक करताना जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
अमळनेर तालुक्यातील वाळु चोरी विरोधी पथकाने तापी, पांझरा, बोरी नदीपात्रातुन अवैधरित्या गौणखनीजाचे अत्खनन करुन वाहतुक करीत असतांना जप्त केलेल्या वाहन मालकां विरुध्द दंडात्मक कार्यवाहीचे आदेश पारित करण्यात आलेले आहे. परंतु उक्त वाहनांचे मालक यांनी दंडात्मक कार्यवाहीतील आदेशातील रक्कम शासन जमा केलेले नसल्याने सदर वाहने हे जंगम मालमत्ता अटकावुन ठेवण्याचे अधिपत्र नमुना नं. ३ नुसार अटकावुन ठेवण्यात आलेले आहे. त्या वाहनांचे जाहिर लिलावाव्दारे विक्री करुन दंडात्मक कार्यवाहीतील रक्कम वसुल करणेकामी दिनांक १५/०९/२०२१ रोजी तहसिल कार्यालय अमळनेर येथे सकाळी ११.०० वाजता
जप्त केलेल्या वाहनांचे लिलाव करण्यात येत आहे.यात 5 ट्रॅक्टर,2 ट्रक, आणि 6 टेंपो चा समावेश आहे.
सदर लिलावात भाग घेऊ इच्छीणाऱ्या व्यक्तींना कळविण्यात येते की, त्यांनी लिलावात भाग घेण्याचा अर्ज, लिलाव होणाऱ्या जंगम मालमत्तेची हातची किंमत, अनामत रक्कम तसेच लिलावाच्या अटी वबशर्ती या करीता तहसिलदार अमळनेर यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. लिलिवातील अटी व शर्ती
खालील प्रमाणे आहेत.
१. लिलावात भाग घेण्याची निविदा अर्जाचे शुल्क रक्कम रुपये ५०००/- प्रत्येक वाहनांसाठी अर्जाचे शुल्क वेगवेगळे भरावे लागेल.
२. लिलावात भाग घेणाऱ्या व्यक्तीला अनामत रक्कम रुपये ५०००/- रोखीने जमा करणे आवश्यक आहे.
३. लिलाव धारकाने सर्वोच्च बोलीने वाहन घेतल्याबरोबरच त्या सर्वोच्च बोलीची रक्कम २४ तासाच्या आत चलनाने जमा करावी लागेल.
४. सदर वाहन लिलाव ठरलेल्या दिवशी सकाळी ११.०० वाजता सुरु होईल.
एकापेक्षा अधिक लिलाव असल्यास एका लिलावाची प्रक्रिया झाल्यानंतर पुढील लिलाव सुरु करण्यात

५. सदर वाहन लिलाव ठरलेल्या दिवशी सकाळी ११.०० वाजता सुरु होईल.
एकापेक्षा अधिक लिलाव असल्यास एका लिलावाची प्रक्रिया झाल्यानंतर पुढील लिलाव सुरु करण्यात येईल.
६. लिलावात भाग घेऊ इच्छीणाऱ्या व्यक्तींना अनामत रक्कम रुपये ५०००/- इतकी रक्कम भरुन लिलावात भाग घेता येईल.
७. लिलावात भाग घेणाऱ्या व्यक्तींपैकी ज्याची बोली सर्वोच्च असेल त्या व्यक्तीची अनामत लिलावाच्या-सर्वोच्च बोलीच्या २५ टक्के रक्कमेमध्ये समाविष्ट करण्यात येईल.
८. सर्वोच्च बोली बोलणाऱ्या व्यक्तीने २४ तासाच्या आत सर्वोच्च बोलीची रक्कम चलनाने सरकार जमा न केल्यास सदरची अनामत रक्कम रुपये ५०००/- ही जप्त करण्यात येईल.
९. जप्त केलेल्या वाहनांच्या लिलावाबाबत मा. उपविभागीय अधिकारी अमळनेर भाग अमळनेर यांनी निश्चीत केलेली हातची किंमत (Upset Price) म्हणुन धरण्यात येईल, व लिलावात भाग घेणाऱ्या व्यक्तींनी सदर हातच्या किंमतीच्या पुढे बोली लावावयाची आहे.
१०. लावण्यात येणारी बोली ही रक्कम रुपये ५०००/- किंवा त्याच्या पटील असेल.
११. एका लिलावात भाग घेणाऱ्या व्यक्तीस दुसऱ्या वाहन लिलावात भाग घ्यावयाचा असल्यास त्याची अनामत रक्कम या आधीच्या लिलावात सर्वोच्च बोली बोलल्याने समाविष्ट झाली असल्यास पुन्हा रक्कम रुपये ५०००/- अनामत म्हणुन भरावी लागतील.
१२. तहसिलदार किंवा त्यांचे अनुपस्थितीत लिलाव करणाऱ्या अधिकाऱ्यास कोणत्याही पुरेशा कारणास्तव लिलाव वेळोवेळी तहकुब करता येईल.
१३. परंतु ३० दिवसांपेक्षा अधिक मुदतीसाठी विक्री तहकुब करण्यात आल्यास नविन उदघोषणा करण्यात येईल.
१४. जेव्हा विक्री कायम केली जाण्यास पात्र असेल तेव्हा, खरेदीदार म्हणुन जाहिर करण्यात आलेल्या लिलावधारकास त्याने बोली केलेल्या रक्कमेच्या पंचवीस टक्के रक्कम ताबडतोब भरणे बंधनकारक असेल.
१५. अशा बोललेल्या बोलीच्या २५ % रक्कम अनामत ठेवण्यास कसुर केल्यास, ती मालमत्ता ताबडतोब विक्री साठी पुन्हा काढण्यात येईल व अश्या कसुरदार व्यक्तीने लिलावात भाग घेण्यासाठी भरलेली अनामत रक्कम रु. ५०००/- सरकार जमा करण्यात येईल.
१६.अशा विक्री रद्द करण्याच्या मागणीचा अर्ज मा. जिल्हाधिकारी साो. जळगाव यांनी संमत केल्यास विक्री रद्द होईल व नवीन विक्रीनुसार मा. जिल्हाधिकारी आदेश देतील त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल.
१७. मा. जिल्हाधिकारी हे स्वत: महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २०६ अन्वये विक्री रद्द करु शकतील
१८.प्रत्येक लिलावासाठी वेगळे बंधपत्र भरुन देणे बंधनकारक आहे. तसेच रुपये ५०००/- ही रक्कम यथास्थिती त्याने खरेदी घेतलेल्या प्रत्येक लिलावामध्ये जमा करणे आवश्यक आहे.
१९. लिलावात भाग घेणाऱ्या व्यक्तीपैकी कोणीही लिलावामध्ये हातची किंमतीपेक्षा जास्त बोली न बोलणाऱ्या लिलावामध्ये भाग घेणाऱ्या सर्व व्यक्तींचे लिलावात भाग घेण्यासाठी भरलेली अनामत रक्कम रुपये ५०००/- सरकार जमा करण्यात येईल.
२०. सदर वाहन लिलावा संदर्भात सर्व अधिकार तहसिलदार अमळनेर यांचेकडे राखुन ठेवलेले आहे.
उक्त दिनांकास वरील प्रमाणे जंगम मालमतेचे जाहिर लिलाव करण्यात येत आहे.
तरी जास्तीत जास्त लोकांनी /संस्थानी लिलावात भाग घ्यावा ही विनंती.असे आवाहन तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button