Amalner

?️ धक्कादायक …तांदळी येथे १९ वर्षीय विवाहितेस शिवीगाळ, मारहाण करून पेटवून देण्याचा केला प्रयत्न पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल…

तांदळी येथे १९ वर्षीय विवाहितेस शिवीगाळ, मारहाण करून पेटवून देण्याचा केला प्रयत्न पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल…

रजनीकांत पाटील

अमळनेर :- तालुक्यातील तांदळी येथे १९ वर्षीय विवाहितेने सासरच्या मंडळींविरुद्ध शिवीगाळ व मारहाण करून जिवंत पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. मारवड पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फिर्यादी अश्र्विनी निलेश परदेशी (रा. तांदळी) हिने दिलेल्या फिर्यादीनुसार, २ वर्षांपासून प्रेमसंबंध जुळल्याने अश्विनी व निलेश परदेशी यांचा विवाह १४ मे २०२० रोजी कपिलेश्वर मंदिरावर पार पडला होता. लग्नानंतर विवाहितेची जेठानी व पती हे किरकोळ कारणावरून अर्वाच्च भाषेत तिला शिवीगाळ करत. मात्र त्याच्याकडे तिने दुर्लक्ष केले. त्यानंतर दि. २२ ऑक्टोबर रोजी सकाळी जेठाणी व पती यांनी सदर विवाहितेला शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर विवाहितेची सासू, जेठाणी व पती यांनी डिझेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न करत असताना विवाहिता दोघांना धक्का देवून बाहेर ओट्यावर पळाली. त्यानंतर पती निलेश याने त्याच्या दोन मित्रांना पत्नी अश्विनी हिला तिच्या आईकडे फेकून या असे सांगितले. त्यानंतर त्या दोघांनी अश्विनी हिला तिच्या आई वडिलांच्या घरी सोडले. व पती निलेश याने तिथे ही पत्नी अश्विनी हिच्या आईला शिवीगाळ केली वडील मारहाण केली असा आरोप फिर्यादीत केला आहे. त्यानुसार सदर विवाहितेचा पती, जेठाणी, सासू यासह पतीचे दोन मित्र यांच्याविरुद्ध मारवड पोलिस ठाण्यात भा. द. वी. कलम ३०७, ४९८ A, ३२४, २९४, २०१, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एपीआय राहुल फुला हे करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button