Faijpur

खिरोदा प्रा.आ.केंद्रात महिला आरोग्यदिनी नारीशक्ती तर्फे आरोग्य कर्मचाऱ्यांचा व आशांचा सन्मान आरोग्य सेविका पल्लवी भारंबेंचा आत्मनिर्भर महिला म्हणून विशेष गौरव

खिरोदा प्रा.आ.केंद्रात महिला आरोग्यदिनी नारीशक्ती तर्फे आरोग्य कर्मचाऱ्यांचा व आशांचा सन्मान आरोग्य सेविका पल्लवी भारंबेंचा आत्मनिर्भर महिला म्हणून विशेष गौरव

सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल

फैजपूर : जागतिक महिला आरोग्य दिनानिमित्त खिरोदा येथील कस्तुरबा प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य कर्मचारी तसेच आशा स्वयंसेवीका यांचा खान्देश नारीशक्ती अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.कोरोनाच्या संकटकाळात जिवाची पर्वा न करता सगळ्यात जास्त जर कोणी धोका पत्करून लोकांचे जीव वाचवण्यासाठी धडपड केली असेल तर ते म्हणजे आपले आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेवीका.म्हणून त्यांचा सन्मान करणे म्हणजे एकप्रकारे देवदुतांचा सन्मान करणे होय असे प्रतिपादन यावेळी नारीशक्ती अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या सौ.दिपाली चौधरी झोपे यांनी व्यक्त केले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ.विजया झोपे,डॉ.सौ.प्रियंका राजपूत, डॉ.जमिल पिंजारी, डॉ.अमीर तडवी यांच्यासह आरोग्य सेविका श्रीमती पल्लवी पुरुषोत्तम भारंबे,निर्मला देविदास बैरागी,ज्योती विलास इंगळे,माधुरी जनार्दन मानकर,प्रेमलता संजय पाटील तसेच आशा स्वयंसेवीका पुनम शांताराम मानकर,रोहिणी नरेंद्र राणे,आसिफा मुजात तडवी,शिल्पा संजय चौधरी,बानु नशिर तडवी,शरिफा कुर्बान तडवी,शाबेरा फरीद तडवी,अधिसेविका मोहिनी पुरुषोत्तम भारंबे आणि वैभवी खिस्ते यांचा कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी आरोग्य सेविका श्रीमती पल्लवी पुरुषोत्तम भारंबे यांचा आत्मनिर्भर महिला पुरस्कार प्रदान करुन विशेष सत्कार करण्यात आला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button