Shirdi

श्रीसाई मंदिरातील गुढीपाडवा २०२०

श्रीसाई मंदिरातील गुढीपाडवा २०२०

प्रतिनिधी राहुल फुंदे

गुढीपाडव्यानिमित्त बुधवार,दि.२५ मार्च २०२० रोजी सुर्योदयाला साईमंदिराच्या सुवर्ण शिखरावर गुढी उभारण्यात आली. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.अरुण डोंगरे (I.A.S.) व सौ.अंजली डोंगरे यांच्या हस्ते गणपती वरूण यांच्यासह ब्रम्हध्वजाची पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यात आली.
स्वच्छ केलेल्या वेळूच्या काठीवर केशरी रंगाचे नवीन वस्त्र, चांदीचा कलश, लिंबाचा डहाळा इत्यादी बांधून ब्रम्हध्वज शिखराच्या पूर्व बाजूस बांधण्यात आला. त्याची विधीवत पूजा करून लिंबाचा फुलोरा हिंग मिरे गूळ आणि चिंच यांच्या मिश्रणाचा नैवेद्य यावेळी दाखवण्यात आला.
सध्या मानव जातीवर आलेले कोरोनाचे संकट लवकर निवारण करून देशाबरोबरच जगभरात सुख, शांती, समृद्धी नांदावी. यासाठी मा.अरूण डोंगरे(I.A.S.) व सौ.अंजली डोंगरे यांनी साईबाबांना साकडे घातले आणि गुढीपाडव्या निमित्त सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

साईबाबांच्या मूर्तीवर गुढीपाडव्याच्या निमित्ताने सुवर्णालंकार, सुवर्ण मुकूट घालण्यात आला. याशिवाय साखरेच्या गाठी कड्यांचा हारही घालण्यात आला.

एप्रिल अखेर रोगराई संपेल; साईदरबारी गुढीपाडव्यानिमित्त संवत्सर फलाचे वाचन

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button