Shirdi

साईभक्तांनी साईसंस्थांनकडे केलेल्या मागणीला यश ; देणगी कार्यालय सुरू

साईभक्तांनी साईसंस्थांनकडे केलेल्या मागणीला यश ; देणगी कार्यालय सुरू

राहुल फुंदे

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने साईभक्‍तांच्‍या मागणीवरुन प्रवेशव्‍दार क्रमांक ०४ समोर साईभक्‍तांकडून श्रींचे वस्‍त्र व देणगी स्विकारण्‍यासाठी देणगी कार्यालय सुरु करण्‍यात आले असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.

श्री.डोंगरे म्‍हणाले, या वर्षी देश व राज्‍यावर आलेल्‍या कोरोना व्‍हायरसच्‍या संकटामुळे प्रतिबंधात्‍मक उपायांकरीता शासनाच्‍या वतीने लॉकडाऊन करण्‍यात आले असून दिनांक १७ मार्च पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी बंद ठेवण्‍यात आलेले आहे. तथापि अनेक साईभक्‍तांकडून श्रीसाईबाबांना वस्‍त्र अर्पण व देणगी देण्‍याकरीता देणगी कक्ष सुरु करावे अशी मागणी वारंवार होत होती. त्‍यानुसार संस्‍थानच्‍या वतीने मंदिर परिसर प्रवेशव्‍दार क्रमांक ४ च्‍या समोर देणगी कार्यालय सुरु करण्‍यात आलेले आहे.

तरी साईभक्‍तांनी देणगी देतानी सोशलडिस्‍टन्‍स च्‍या नियमांचे पालन करुन तसेच मास्‍कचा वापर करुन देणगी कार्यालयात आपणास श्रींना अर्पण करावयाचे वस्‍त्र व देणगी जमा करावी असे सांगुन देणगी देतानी संस्‍थानचे संरक्षण व देणगी स्विकारणारे कर्मचा-यांना सहकार्य करावे असे आवाहन श्री.डोंगरे यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button