Shirdi

? Breaking..तृप्ती देसाई च्या तोंडाला काळ फसू, शिवसेना महिला आघाडीचा इशारा

? Breaking..तृप्ती देसाई च्या तोंडाला काळ फसू, शिवसेना महिला आघाडीचा इशारा

शिर्डी : भक्तांच्या कपड्यासंदर्भात साई संस्थान आणि तृप्ती देसाई यांच्या वादात आता शिवसेनेनं उडी घेतली आहे. मंदिरातील पुजारी अर्धनग्न असतात. मग भक्तांच्या कपड्यांबाबत निर्बंध का? असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी साई संस्थानला केला होता. यावर आता शिवसेनेकडून थेट तृप्ती देसाईंना इशारा देण्यात आला आहे. शिर्डीत येऊन स्टंटबाजी केल्यास शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ आणि तोंडाला काळं फासू असा धमकीवजा इशारा शिवसेना महिला तालुका संघटक स्वाती परदेशी यांनी दिला. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.

शिर्डीतील साई मंदिरात दर्शन घेण्यासाठी येत असाल तर भारतीय पेहरावात यावं. तोकडे कपडे घालून मंदिरात येऊ नये, असं आवाहन साई संस्थानतर्फे करण्यात आलं होतं. त्यावर तृप्ती देसाई यांनी आवाज उठवला होता. त्यामुळे तृप्ती देसाईंविरोधात आता शिवसेना महिला आघाडी आक्रमक झाल्या आहेत. शिर्डीत येऊन त्यांनी स्टंटबाजी केली तर शिवसेना स्टाईलने त्यांनी उत्तर देऊ अशी धमकीच शिवसेनेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे यावर आता तृप्ती देसाई काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.

काय आहे नेमकं प्रकरण ?

साई मंदिरात येताना भारतीय पेहराव करावा. तोकडे कपडे घालून मंदिरात येऊ नये, असे आवाहन साई संस्थानतर्फे मंगळवारी (30 नोव्हेंबर) ला करण्यात आलं होतं. तशा आशयाचे फलकदेखील साईबाबा मंदिर परिसरात लावण्यात आले होते. यावर बोलताना देसाई यांनी मंदिरातील पुजारी अर्धनग्न असतात. मग भक्तांच्या कपड्यांबाबत निर्बंध का? असा सवाल उपस्थित केला होता.

साई संस्थानच्या या आवाहनावर बोलताना, अशा आशयाचे फलक लावणं म्हणजे हा भारतीय संविधानाचा अवमान असल्याचं त्या म्हणाल्या होत्या. ‘शिर्डीच्या साईबाबा मंदिरात भक्तगण देश-विदेशातून येतात. हे भक्त वेगवेगळ्या जातीधर्माचे असतात. शिर्डी संस्थानने मंदिर परिसरात भक्तांनी सभ्य पोशाख घालून यावं या आशयाचा एक बोर्ड लावला आहे. भारत देशात संविधान आहे. संविधानाने अभिव्यक्ती आणि व्यक्तिस्वातंत्र्य दिलं आहे. त्यामुळे कुणी काय बोलाव? काय बोलू नये हा? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. हा संविधानाचा आपमान आहे,’ असे त्या म्हणाल्या होत्या.

तसंच, मंदिरामध्ये कशा पद्दतीचे कपडे घालायला पाहिजेत याचं भान भक्तांना आहे. भक्तांची श्रद्धा कपड्यांवरून ठरवू शकत नाहीत. श्रद्धा महत्वाची असते, असं वक्तव्य त्यांनी साई संस्थानला उद्देशून केलं होतं. त्यामुळे यावर शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेत तृप्ती देसाईंना इशारा दिला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button