बोदवड/जळगांव

एडवोकेट अर्जुन पाटील यांची भारत सरकार नोटरी पदी नियुक्ती

एडवोकेट अर्जुन पाटील यांची भारत सरकार नोटरी पदी नियुक्ती

बोदवड प्रतिनिधी सुरेश कोळी

एडवोकेट अर्जुन तुळशीराम पाटील यांना नुकतीच भारत सरकार नवी दिल्ली मार्फत नोटरी पदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे नियुक्तीपत्र त्यांना नुकतेच मिळाले आहे .
एडवोकेट अर्जुन पाटील हे बोदवड तालुका वकील संघाचे अध्यक्ष आहेत. भारत सरकारच्या नोटरी पदी नियुक्ती होणारे ते बोदवड तालुक्याची निर्मिती झाल्यापासून ते पहिलेच वकील आहेत .
त्यांच्या नियुक्तीमुळे बोदवड तालुका व परिसरातील लोकांना जळगाव,भुसावळ, जामनेर, मलकापूर येथे नोटरी करण्यासाठी साठी जाण्याची आता आवश्यकता राहणार नाही. त्यामुळे बोदवड तालुका व परिसरातील लोकांचा तीस ते पन्नास किलोमीटरचा वेळ व पैसा आता वाचणार आहे. नोटरी करण्यासाठी जाण्याचा प्रवास आता थांबणार आहे. एडवोकेट अर्जुन पाटील यांची नोटरी पदी नियुक्ती झाल्याने बोदवड तालुका व्यापारी असोसिएशन, पत्रकार संघटना ,बोदवड तालुका वकील संघ , स्टॅम्प वेंडर असोसिएशन, बँकिंग असोसिएशन यांच्याकडून स्वागत केले जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button