बोदवड/जळगांव

बोदवड जळगाव रस्ता खराब झाल्याने ॲम्बुलन्स सुविधा बंद..रुग्णांचे हाल…

बोदवड जळगाव रस्ता खराब झाल्याने ॲम्बुलन्स सुविधा बंद..रुग्णांचे हाल…

सुरेश कोळी

बोदवड जळगाव रस्ता अतिशय खराब झाल्यामुळे बोदवड येथील साईदरबार ॲम्बुलन्स चे मालक अविनाश भिसे यांनी ॲम्बुलन्स बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे आणि जोपर्यंत रस्ता दुरुस्त होत नाही तोपर्यंत ॲम्बुलन्स सुरू करणार नाही अशा आशयाचे निवेदन त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले असल्याचे वृत्त आहे.
याबाबत सविस्तर असे की बोदवड ते भुसावळ मार्गे जळगाव व बोदवड ते विचवा सिंधी मार्गे जळगाव रस्ता अतिशय खराब झाल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे झालेले आहेत. साईट पट्ट्या खराब झालेले आहेत. त्यामुळे वाहनांना येण्या जाण्यास मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते. परिणामी ऍम्ब्युलन्समध्ये एखाद्यावेळेस रुग्ण घेऊन जात असताना सलाईन लावून घेऊन जावे लागते किंवा डिलिव्हरीचे पेशंट असतात त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होते. रुग्ण दगावण्याचा संभव असतो .म्हणून बोदवड येथील साईदरबार ॲम्बुलन्स चे मालक अविनाश भिसे यांनी संबंधित विभागाकडे जोपर्यंत रस्ता चांगला होत नाही तोपर्यंत ॲम्बुलन्स सुविधा बंद ठेवू असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लवकरात लवकर ते जळगाव रस्ता ते सिंधी सुरवाडा विचवा मार्गे जळगाव रस्ता त्वरित दुरुस्त करण्यात यावा जर रुग्णाचे कमी-जास्त झाले तर याला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहतील असे त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button