Mumbai

Mumbai:आझाद मैदानावर आजपासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

मुंबईच्या आझाद मैदानावर आजपासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

मुंबई प्रतिनिधी । सुशिल कुवर :

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढ, मासिक पेन्शन, नवीन मोबाईल, मराठी ऍप, अंगणवाड्यांच्या भाड्यात वाढ, आहाराच्या दरात वाढ इत्यादी मागण्यांसाठी मुंबई, ठाणे, पालघर रायगड इत्यादी जवळच्या जिल्ह्यांमधील अंगणवाडी कर्मचारी आज पासून तीन दिवस आझाद मैदान, मुंबई येथे तीव्र धरणे आंदोलन करणार आहेत.

या आंदोलनात मुंबई व ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी रोज २०० च्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती अंगणवाडी संघटनेच्या नेत्या शुभा शमीम यांनी दिली आहे.

तसेच आंदोलनात कृती समितीचे एम. ए. पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, कमल परुळेकर, भगवानराव देशमुख, सुवर्णा तळेकर, जयश्री पाटील आदीसह प्रमुख नेते सहभागी होणार आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button