Motha Waghoda

मोठा वाघोदा येथील हजरत पीर बालेशा बाबांचा 15 रोजी उर्स शरीफ १४ रोजी संदल १५ उर्स कव्वाली

मोठा वाघोदा येथील हजरत पीर बालेशा बाबांचा 15 रोजी उर्स शरीफ
१४ रोजी संदल १५ उर्स कव्वाली

मुबारक तडवी प्रतिनिधी मोठा वाघोदा

तालुका रावेर /- रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा येथील जागृत पिरस्थान हिंदू-मुस्लिम एकात्मतेचे प्रतिक मानले जाणारे अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावरील कब्रस्थान स्थित मोठा वाघ गोदावास यांचे आराध्य दैवत नवसाला पावणारा पिरोबा हजरत पीर बालेशहा वली रहमतुल्ला अलैयांचा उर्स सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या धुमधडाक्यात दिनांक 14 फेब्रुवारी संदल व 15 फेब्रुवारी मुंबई येथील प्रसिद्ध कव्वाल अन्वर जानी व व खंडवा मध्य प्रदेश येथील कव्वालन अफसाना कौसर यांच्यात कव्वाली ची जुगलबंदी होत साजरा होत आहे .

मोठा वाघोदा येथील हजरत पीर बालेशा बाबांचा 15 रोजी उर्स शरीफ १४ रोजी संदल १५ उर्स कव्वाली

बालेशाह बाबांच्या उरुसानिमित्त महाराष्ट्रासह पंचक्रोशीतील मध्यप्रदेश विदर्भासह महाराष्ट्रातील भाविक बहुसंख्येने या सोहळ्यात सहभागी होऊन नवसाला पावणाऱ्या या पीर बाबांच्या दर्गा वर माणलेले नवस फेडण्यास आवर्जून हजेरी लावतात बाबांचा संदल ढोल-ताशांच्या वाद्यांच्या गजरात मिरवणुकीने दर्गावर मोठ्या धुमधडाक्यात चढविला जातो उरुसानिमित्त तीन दिवस मोठी यात्रा निंभोरा रस्ता परिसरात भरते यात विविध खाद्यपदार्थ खेळणी आकाशपाळणे विविध संसारोपयोगी दुकाने थाटली जातात सालाबाद प्रमाणे यंदाही हजरत पीर बाला शाह बाबा यांचा यांचा उर्स सोहळा दिनांक 14 फेब्रुवारी रोजी संदल मिरवणूक काढण्यात येणार असून दिनांक 15 फेब्रुवारी रोजी कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तरी भाविकांनी उरुसानिमित्त मोठा वाघोदा येथे हजरत पीर वाले शहा बाबा यांच्या दर्गा वर दर्शना करिता हजेरी लावून मनोरंजनाचा व दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button