India

आणि जयलालितांनी अनुभवलं विधानसभेत वस्त्रहरण..!पहा काय आहे इतिहास..निमित्त थलायवीच्या प्रदर्शनाचं..!

आणि जयलालितांनी अनुभवलं विधानसभेत वस्त्रहरण..!पहा काय आहे इतिहास..निमित्त थलायवीच्या प्रदर्शनाचं..!

जयललिता यांच्या जीवनावरील थलायवी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.10 सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल.यात मुख्य भूमिकेत कंगना रणावत असून तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे.जयललिता यांच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. अगदी सुरुवातीला चित्रपट अभिनेत्री म्हणून काम सुरू करताना पासून ते तामिळनाडू च्या मुख्यमंत्री होण्या पर्यंतचा त्यांचा प्रवास खूपच खडतर होता.हा संपूर्ण संघर्ष ह्या चित्रपटात दाखविण्यात आला आहे. बॉलिवूड मधून ह्या अत्यंत प्रतिभावान आणि शक्तिशाली स्त्रीची कथा मोठ्या पडद्यावर दाखवण्याची दिग्दर्शनाची ए एल विजय यांनी स्वीकारली आणि मुख्य भूमिकेचे आव्हान कंगना ने स्विकारलं..

कंगना रनौतचा थलायवी हा चित्रपट उद्या 10 सप्टेंबरला रिलीज होत आहे.ज्येष्ठ अभिनेते आणि राजकारणी एम जी रामचंद्रन यांच्याशी असलेल्या नात्या पासून ते नंतर तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होणाऱ्या जयललिता यांच्या आयुष्यातील अनेक पैलू या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. चित्रपटात एमजींची भूमिका ज्येष्ठ अभिनेते अरविंद स्वामी यांनी साकारली आहे.

ह्या चित्रपटाच्या निमित्ताने एक किस्सा तोही अगदी संतापजनक आणि जयललिता यांच्या राजकीय कारकीर्दीला वळण देणारा ठरला..हा प्रसंग जितका अपमानास्पद होता तितकाच लाजिरवाणा देखील…महाभारतात द्रौपदी च वस्त्रहरण हा अत्यंत लाजिरवाणा प्रकार घडला आणि तो भारतीय स्त्रीच्या अस्मितेला धक्का देणारा प्रसंग होता.अश्याच एका अत्यंत लाजीरवाण्या प्रसंगाला जयललिता यांना विधानसभेत सामोरे जावे लागले होते.32 वर्षांपूर्वी 23 मार्च 1989 रोजी हा किस्सा घडला.विधानसभेत जयललिता यांच्या वर हल्ला झाला होता. यावेळी अर्थसंकल्प सादर करण्यात येत होता आणि करुणानिधी यांना काँग्रेसच्या आमदारांनी विरोध केला. या सर्व प्रकारचे मोठ्या भांडणात रूपांतर झाले. खुर्च्या,टेबल,पुस्तके फेकण्यात अली.याचवेळी जयललिता यांचा पदर खेचण्यात आला.अत्यंत लाजिरवाणी अवस्थेत स्वतःला वाचवत जयललिता कश्या बश्या बाहेर पडल्या.आणि हे क्षण कॅमेरात कैद झाले.त्याच वेळी जयललिता यांनी शपथ घेतली होती की जेंव्हा मुख्यमंत्री होईल तेंव्हाच विधानसभेत पाय ठेवेल.ही शपथ त्यांनी पूर्ण केली.महाभारतातील द्रौपदी चा साक्षात अनुभव जयललिता यांनी आधुनिक काळात घेतला हे म्हणणे वावगे ठरणार नाही. तेंव्हा ही दुः शासन होता आणि आधुनिक काळात देखील त्या प्रवृत्ती चे लोक आहेत हेच ह्या प्रसंगाने सिद्ध झाले आहे.थलायवी ह्या चित्रपटात देखील हा प्रसंग चित्रित करण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button