Amalner

अमळनेरच्या विद्यमान आमदारांच्या शब्दाला किंमत नाही..! खा शि च्या निगरगठ्ठ “शेठ मंडळाने” ठेवलं फाट्यावर…! कुठून आला हा माज..!

अमळनेर च्या विद्यमान आमदारांच्या कार्यकर्त्यांना देखील खा शि च्या निगरगठ्ठ शेठ मंडळाने ठेवलं फाट्यावर…!कुठून आला हा माज..!

अमळनेर येथील विद्यमान आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. सध्या तालुक्यात खा शि मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाचे प्रताप जोरात आहेत.अत्यन्त निर्ढावलेले हे शेठ मंडळ अनेक बाबींमध्ये लोकांच्या नजरेत आहेत.खा शि ची निवडणूक,पद भरती,नियोजन शून्य व्यवस्थापन, प्राचार्य डॉ ज्योती राणे यांचा राजीनामा,डॉ बी एस पाटील यांचा राजीनामा,खा शि सभासदत्व,महाविद्यालयातील अनेक युनिट बंद होणे,माहितीच्या अधिकाराचे उलट उत्तर देणे अश्या एक ना अनेक तक्रारींचा पाढाच आहे.म्हणूनच खान्देश शिक्षण मंडळाचे नाव बदलून खादाड शिक्षण मंडळ असे करण्यात आले आहे.

आता गेल्या 15 दिवसांपासून 70 विद्यार्थ्यांना नापास करणे अनुपस्थित दाखवणे असा प्रकार घडला असून या संदर्भात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ने यावर आवाज उठवला असून टाळा ठोक आंदोलन,त्यानंतर विद्यापीठात पत्रव्यवहार, आणि आज पूर्वसूचना देऊन केलेले आत्मदहनाचा प्रयत्न.. एव्हढं सगळं घडून देखील निगरगठ्ठ,बेडर संचालक मंडळ बिलकुल हलले नाही.विशेष म्हणजे अमळनेर चे विद्यमान आमदार यांनी सदर प्रकरणात मध्यस्ती केली होती. ते स्वतः विद्यापीठ प्रशासनास भेटून प्रश्न मांडून आले आहेत. हा सर्व ऊहापोह करण्याचे कारण म्हणजे खा शि च्या संचालक मंडळाला एव्हढी कसली मग्रुरी आणि माज आहे की खुद्द ज्या सत्तेत असलेल्या आमदारांच्या कार्यकर्त्यांना विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एव्हढं लढावं लागत असेल तर खा शि चे संचालक मंडळ किती गेंड्याच्या कातडीचे आहेत.आज ते विद्यार्थी व पदाधिकारी यांच्या जीवाशी खेळले आहेत.उद्या एखाद्या सामान्य माणसानदी न्याय मागण्याचा प्रयत्न केला तर त्याला न्याय मिळेल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावरून दुसरा एक विषय चर्चेत आहे तो म्हणजे विद्यमान आमदार यांच्या शब्दाला त्यांच्या कार्यकर्त्यांनाच किंमत नाही.सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या शब्दाला किंमत नाही याचाच अर्थ आमदारांची तालुक्यातील लोकांवर किती पकड आहे? हे निदर्शनास येते. आमदारांच्या मध्यस्तीला किती किंमत आहे हे निदर्शनास आले. एक साधारण संस्थेचे संचालक मंडळ आणि त्यात देखील विद्यमान आमदार यांची शिष्टाई कमी पडली ही निश्चितच विचार करण्यासारखी गोष्ट आहे.70 विद्यार्थ्यांचा महाविद्यालयीन स्तरावरील साधा प्रश्न जो एकाच बैठकीत सुटू शकत होता.तो सुटला नाही.यातच विद्यमान आमदार यांची एकूण तालुक्यावरील पकड आणि विषयाचा अभ्यास त्यावर घ्यायचे निर्णय आणि तथाकथित शेठ मंडळाने त्यांना दाखवलेला ठेंगा यातच खूप काही चित्र स्पष्ट झाले आहे. गावात या संदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे.

संबंधित लेख

Back to top button