?️अमळनेर कट्टा..पिंपळे येथील वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या…
अमळनेर तालुक्यातील पिंपळे येथील भोजु अर्जुन पाटील (वय ८०) यांनी काल त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. घराच्या वरच्या मजल्यावर लोखंडी कडीला दोरी बांधून सकाळी ६ वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
गावातील गणेश पाटील , भैय्या पाटील , दाजीबा पाटील यांनी त्यांना खाली उतरवून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलीस पाटील राजेंद्र माणिक पाटील यांच्या माहितीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत.