Maharashtra

वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थान अमळनेर तर्फे विद्यार्थी गुणगौरव सभारंभ

वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थान अमळनेर तर्फे विद्यार्थी गुणगौरव सभारंभ

वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थान अमळनेर तर्फे विद्यार्थी गुणगौरव सभारंभ

अमळनेर
 येथिल श्री वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थान अमळनेर तर्फे विद्यार्थी गुणगौरव संभारंभ नुकताच उत्साहात पार पडला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उ म वि चे माजी कुलगुरू शिवाजी पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी पोलीस आयुक्त पुणे साहेबराव पाटील हे उपस्थित होते.
            इ.१० वी, ८०% व १२ वी चे ७५% वरील सुमारे ७०० गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ श्री वर्णेश्वर महादेव मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी पोलिस निरीक्षक अंबादास मोरे,स पो नि प्रकाश सदगीर,खा.शि मंडळाचे चेअरमन प्रदीप अग्रवाल,मुंबईचे निंबा पाटील, चोपड्याचे जीवन चौधरी,आनंद कंखरे  व्यासपीठावर उपस्थित होते.कार्यक्रमात उद्योगरत्न म्हणून प्रताप साळी,विजय पाटील,निलेश पाटील,योगेश पाटील यांना तर वृक्षमित्र पुरस्कार  तुळशीराम भदाणे,पक्षीमित्र पुरस्कार सुनील भोई यांना सन्मानित करण्यात आले.स्पर्धा परीक्षेत यश मिळविणारे सेल टॅक्स ऑफिसर स्वप्नील वानखेडे,संदीप मखमल पाटील त्यांच्या सोबतच काम करणारी त्यांची पत्नी हर्षा पाटील सोबतच नियोजन अधिकारी विनोद धनगर, कु.ऋतुजा पाटील,भावना पाटील यांच्या सह नवीनच पी एस आय म्हणून निवड झालेले पोलीस शरद पाटील,जिल्हा नियोजन मंडळ सदस्य पंकज चौधरी तसेच पाडळसरे धरण जनआंदोलन संघर्ष समिती सदस्यां यांचाही सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला तर राजे संभाजी मित्र मंडळाच्या समाजप्रबोधनाच्या जिवंत देखावा करणाऱ्या युवा कलाकारांचा आणि अमळगाव येथिल रामराज्य फाउंडेशन चाही गौरव करण्यात आला.         
            कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष सुभाष चौधरी यांनी , “१६/१७ वर्षांपासून गुणी गुणगौरव कार्यक्रम जागृत वर्णेश्वर महादेव मंदिरावर मी आयोजित करत असतो तर माझ्या दर वाढदिवसाला १९६६ पासून वृक्षारोपण करतो तसे आपणही वृक्ष लावावे!” असे आवाहन केले. याप्रसंगी निवृत्त पोलिस अधिकारी साहेबराव पाटील,  निंबा पाटील, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक विजयसिंग पवार,सेल टॅक्स ऑफिसर हर्षा पाटील यांनी विद्यार्थाना मार्गदर्शन केले.
        कार्यक्रम यशस्विते साठी चंदुसिंग परदेशी, न प गटनेते प्रवीण पाठक, संजय शुक्ल,नाना पाटील,सुनील पवार,गोरख पाटील,भावना पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्र अर्बन बँक संचालिका वसुंधरा लांडगे, सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी केले तर आभार गिरीश सोनजी पाटील यांनी मानले तर जगन पाटील यांचे सहकार्य लाभले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button