Amalner

Amalner:लोकसहभाग आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या प्रयत्नातून 40% अमळनेर शहर CCTV कक्षेत..!लवकरच लागणार हाय डेफिनेशन कॅमेरे..!

Amalner:लोकसहभाग आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या प्रयत्नातून 40% अमळनेर शहर CCTV कक्षेत..!लवकरच लागणार हाय डेफिनेशन कॅमेरे..!

अमळनेर शहर व तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. संपूर्ण तालुक्यात मोठया प्रमाणात चोऱ्या होत आहेत. त्यामुळे गुन्हेगारी आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून शहरातील विविध ठिकाणी कॅमेरा बसविण्याची मोहीम जोमाने सुरू केली आहे.

तालुक्यातील गुन्हेगारी चे वाढते स्वरूप पाहता कडक धोरण पोलिस प्रशासनाने अवलंबावे,अशी मागणी सातत्याने नागरिकांमधून होत होती. त्या पार्श्वभूमीवर अमळनेर उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव हे अनेक दिवसांपासून शहरातील गुन्हेगारीला आळा बसावा म्हणून सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यापैकी त्यांनी शहरातील संपूर्ण चौक व महत्वपूर्ण विभागात लोकसहभागातून कॅमेरा बसविण्याचा चंग बांधला व त्यांनी तसे नागरिकांना आवाहन केले.त्यांच्या या आवाहनाला शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांनीं भरभरून प्रतिसाद दिल्याने ठीक ठिकाणी कमेरा बसविण्याचे काम जोरात सुरु झाले आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव हे स्वतः शहर व तालुक्यातील प्रतिष्ठित, सन्माननीय नागरिकांना भेटत आहेत व दुकाने घरे यांच्या बाहेर cctv कॅमेरे बसवून घेण्यास लोकांची मानसिकता तयार करून त्या पद्धतीने कॅमेरांचे फायदे देखील समजावून सांगत आहेत. प्रत्यक्ष वरिष्ठ अधिकारी स्वतःत्या त्या कॉलनी भागात लोकांच्या कॉर्नर बैठका घेत असल्याने सामान्य जनतेतील पोलिसांबद्दल ची भावना आणि विचार सकारात्मक होत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांचे एकंदरीत बोलणे वागणे आणि व्यवहार अत्यन्त विनयशील असल्याने लोकांमध्ये जनतेत त्यांची प्रतिमा उजळून निघाली आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांनी जवळपास 40% काम पूर्ण झाले असून आता उर्वरित 60% काम देखील येत्या काही दिवसात पूर्ण होईल.लोक चांगला प्रतिसाद देत आहेत.चांगल्या गोष्टी योग्य मार्गाने जनतेला पटवून दिल्यास जनता आणि प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नांनी उत्तम कार्य व चांगला उपक्रम पूर्ण होऊ शकेल.लवकरच अत्यन्त हाय डेफिनेशनचे कॅमेरे शहरातील महत्वाच्या ठिकाणी लावले जातील.लोक उत्स्फूर्तपणे स्वतः यात सहभागी होत आहेत. असे म्हटले आहे.

कॅमेरा बसविल्याने शहरातील गुन्हेगारीला आळा बसण्यास व सामाजिक सलोखा राखण्यात मदत मिळणार आहे. यामुळे तालुक्यातील गुन्हेगारी कमी झाली आहे.चेन स्नॅचिंग, चोऱ्या इ चे प्रमाण देखील कमी होत आहे. चोरांच्या मनात डिटेक्शन ची भीती निर्माण झाली आहे.एक ही गुन्हेगार निर्दोष सुटणार नाही याकरिता सदर उपक्रम महत्वपूर्ण ठरणार आहे.तसेच शहरासह ग्रामीण भागातील गाव खेड्यात देखील ग्राम सुरक्षा दल स्थापून लोकसहभागातून कॅमेरे बसविले जाणार आहेत.

नागरिकांनी स्वयं प्रेरणेने कॅमेरा बसविण्यासाठी पुढाकार घ्यावा.याकरिता ज्यांना ज्यांना मदत करावे असे वाटत असल्यास 9422246778 या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा,असे आवाहन DYSP त्यांनी केले आहे.ज्या नागरिकांनी कॅमेरे लावले त्यांचे स्वतः उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव हे भ्रमणध्वनी वरून अभिनंदन देखील करत आहेत.

अमळनेर तालुक्याला रेल्वे व महामार्गाद्वारे येणाऱ्याची संख्या अफाट असल्याने येण्याजाण्या साठी प्रवाश्यांना खूप मोठ्या प्रमाणात साधन उपलब्ध आहे. याचाच फायदा परराज्या सह जिल्ह्यातील गुन्हेगार तालुक्यात येवून चोरी,घरफोडी सह दरोडे टाकत असल्याचे निष्पन्न झाले आहे. गुन्हा तपासात कालावधी लागत असल्याने समस्या निर्माण होत होती. आता मात्र कॅमेरा बसविल्याने तपास कामात गती मिळून गुन्ह्यास पायबंद घालण्यासाठी मदत होणार असल्याने नागरिकांनी याउपक्रमाचे स्वागत करून उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button