Pune

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचा भंग! हॉटेल चालू ठेवून गर्दी जमवल्याने केली कारवाई

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचा भंग! हॉटेल चालू ठेवून गर्दी जमवल्याने केली कारवाई

दत्ता पारेकर पुणे

पुणे : राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून दिवसेंदिवस रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने पुणे जिल्ह्यात दि.३ एप्रिल पासून पुढील सात दिवस शासनाकडून कडक निर्बंध घालण्यात आले असून या आदेशाचे पालन न केल्याने इंदापूर पोलिसांनी शहरातील हॉटेल चालकावर कारवाई केली आहे.

याबाबत इंदापूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी पुणे यांच्या दि.२ एप्रिल २०२१ च्या आदेशान्वये दि. ३ एप्रिल २०२१ पासून पुढील सात दिवस/पुढील आदेशापर्यंत संपूर्ण हॉटेल बंद राहतील व फक्त पार्सल सेवा चालू राहील असा आदेश असताना देखील इंदापूर शहरात गस्त घालत असते वेळी आज दि.४ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास इंदापूर शहरातील बाबा चौक येथे सूर्यकांत दगडू जाधव रा.४० फुटी रोड इंदापूर यांनी त्यांच्या मालकीचे हॉटेल गिरीजाई चालू ठेवून हॉटेलमध्ये गर्दी जमवून खाद्यपदार्थाची विक्री करीत असताना मिळून आल्याने व जिल्हाधिकारी पुणे यांच्या आदेशाचा भंग केल्याने हॉटेल चालकावर भादवि कलम १८८ , २६९ ,२७० महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३३ ( w ) ( n ) आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम २००५ चे ३० , ३३ ,३४ ,४१ , ५१ व भारतीय साथ रोग कायदा १८९७ कलम ३ , ४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून याबाबतची फिर्याद पो.काँ अमोल रामदास गारुडी नेमणूक इंदापूर पोलीस स्टेशन यांनी दिली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button