Amalner

Amalner: जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामपंचयतीचे प्रशिक्षण संपन्न..!

Amalner: जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामपंचयतीचे प्रशिक्षण संपन्न..!

अमळनेर जल जीवन मिशन अंतर्गत अमळनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे प्रशिक्षण घेण्यात आले. यास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
जल जीवन मिशन अंतर्गत अमळनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे लेवल 3 चे प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक 3 मार्चपासून घेण्यात येत होते. सदर प्रशिक्षण हे प्रमुख संसाधन संस्था (केआरसी) म्हणून नेमणूक झालेली राष्ट्रविकास अॅग्रो एज्युकेशन संस्था अमळनेर जिल्हा जळगाव या संस्थे मार्फत प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आले. सदर प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये प्रत्येक गावातून सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, ग्राम पाणी पुरवठा अध्यक्ष, सदस्य,पाणी पुरवठा कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, बचत गट सीआरपी यांना देण्यात आले.

या प्रशिक्षण कार्यक्रमसाठी जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया
उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, अमळनेर गटविकास अधिकारी विशाल शिन्दे, जिल्हा समन्वयक मनोहर सोनवणे यांचे मार्गदर्शन मिळत आहे.
राष्ट्रविकास अॅग्रो एज्युकेशन अध्यक्ष भुपेन्द्र महाले, सचिव तुषार पाटील यांनी प्रशिक्षण कार्यक्रम सर्व नियोजन केले. तसेच प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यासाठी राष्ट्रविकास संस्थेचे समन्वयक नयना चौधरी, महेश माकडे, अमोल सुर्यवंशी, दिलीप पाटील, सिमा महाजन, किशोर बागुल, निलेश पाटील, स्वप्निल पाटील, राजेश्वर पाटील, पवन सनसे, किरण डोंगरे, प्रमोद पाटील, अभिजीत झाबरे यावेळी यांनी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यासाठी मेहनत घेतली.

भारत सरकार द्वारा जल जीवन मिशन अंतर्गत कुटुंबांना नळ जोडणीद्ववारे प्रत्येक व्यक्तीला 55 लिटर पाणी उपलब्ध होईल असे नियोजन पुढील 30 वर्ष साठी या योजनेत करण्यात आले आहे त्याच बरोबर ग्रामपंचायत स्तरावर पाणीपुरवठा योजनेचे व्यवस्थानाची जबाबदारी,ग्रामपंचायत स्तरावर पाणीपुरवठा योजनेची देखभाल दुरुस्ती, पाणीपुरवठा योजना राबवितांना कोणकोणत्या टप्प्यात समुदाय सहभाग, जल जीवन मिशन अंतर्गत लोकवर्गणी कोणकोणत्या स्वरुपात देऊ शकतो, पिण्याच्या पाण्याचा अंदाज पत्रक, स्वच्छता सर्वेक्षण, क्षत्रिय पाणी तपासणी किट, जल जीवन मिशन अंतर्गत पाणी गुणवत्ता नियंत्रण व सर्वेक्षण करण्यासाठी मार्गदर्शन सुचना, स्वच्छता सर्वेक्षणाअंती गावाला हिरव्या रंगाचे कार्ड असणे गरजेचे आहे.

योजना सुरळीत चालविण्यासाठी स्त्रोताची आवश्यकता असून जल जीवन मिशन अंतर्गत 100 टक्के नळ जोडणी झाली पाहिजे, पाणी पुरवठा योजना देखभाल दुरुस्ती संदर्भात, जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना सुरळीत
चालविण्यासाठी स्त्रोताची आवश्यकता संदर्भात, जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हर घर जल व नल मै जल हे देणे देखील अनिवार्य आहे संदर्भात, ग्रामआरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती गठीत करतांना महिलांचे प्रतिनिधीत्व संदर्भात, जल जीवन मिशन अंतर्गत सांडपाणी व्यवस्थापनाचे उपचार, गावातील वर्तमान परिस्थितीची ओळख, सर्व शिक्षण केंद्रामध्ये सुरक्षित पाण्याची गरज त्यामध्ये शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, इत्यादी, पिण्याच्या पाण्याचा व्यवस्था प्रणाली, संस्थात्मक अभिसरण आणि इतर योजनाच्या संसाधनाचा वापर, सहभागी मुल्यांकनासाठी साधने, या संदर्भात जल
जीवन मिशन अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षण देण्यात .आले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button