Pune

?️माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अटक : कारवाई टाळण्यासाठी केला होता हा दावा…

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अटक : कारवाई टाळण्यासाठी केला होता हा दावा…

दत्ता पारेकर

पुणे : माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पुणे पोलिसांनी आज सायंकाळी अटक केली. त्यांच्या विरोधात पुण्यात चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. एक किरकोळ अपघात प्रकरणावरुन झालेल्या भांडणात एका दांपत्याला मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यात आला आहे.
अटक टाळण्यासाठी छातीत दुखत असल्याचा दावा त्यांनी केला होता. पण पोलिसांनी ससून मध्ये तपासणी करून रिसतर अटक केल्याचे सांगण्यात आले.
अमन चड्डा या तरुणाने हर्षवर्धन जाधव व त्यांच्या सोबत असलेल्या इषा झा यांच्याविरोधात ही तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार फिर्यादी चड्डा यांचे आई-वडील दुचाकीवरुन औंध परिसरात जात असताना जाधव यांनी आपल्या चालत्या गाडीचा दरवाजा अचानक उघडला.

त्यामुळे चड्डा यांच्या आईवडिलांना त्याचा धक्का लागला. चड्डा दांपत्याने जाधव यांना याचा जाब विचारल्यावर भांडण झाले. त्यावेळी आपली हृदयशस्त्रक्रीया झाली असल्याचे सांगून देखील जाधव व झा यांनी आपल्या आईवडिलांना मारहाण केली व खुनाचा प्रयत्न केला, अशी तक्रार अमन चड्डा यांनी दिली आहे.

ही बातमी पण वाचा : हर्षवर्धन जाधव यांनी 12 डिसेंबर रोजी केली होती ही घोषणा
औरंगाबाद ः कौटुंबिक वाद, आरोप- प्रत्यारोप आणि सासरे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप करत राज्यभरात खळबळ उडवून देणारे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दोन महिन्यापुर्वी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली होती. एवढेच नाही तर आपल्या राजकीय वारसदार या पत्नी संजना जाधव असतील अशी घोषणा करत जाधव यांनी राजकीय संन्यास घेतला होता. पण त्यांच्या विरोधकांनी व्यक्त केलेला अंदाज खरा ठरला असून जाधव राजकारणात पुन्हा एकदा सक्रीय झाल्याचे दिसून आले आहे. कन्नड-सोयगाव या आपल्या मतदारसंघातील खताचा प्रश्न हाती घेत त्यांनी राज्य सरकारच्या बांधावर खत देण्याची घोषणा कशी फसवी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला.

कन्नड शहरात आज खतांच्या दुकांनासमोर सकाळी दहा वाजल्यापासून शेतकऱ्यांनी भर पावसात रांगा लावल्या होत्या. याची माहिती मिळताच हर्षवर्धन जाधव यांनी तिथे धाव घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत कृषीअधिकाऱ्यांना बोलावून घेत खताची सत्य परिस्थिती आणि सरकारकडून रंगवले जात असलेले चित्र यावर टिकेची झोड उठवली. हर्षवर्धन जाधव म्हणाले, खरीप हंगाम ३० आॅगस्‍टला संपतो आहे, आज १२ तारीख आहे, तरीही शेतकऱ्यांना खत मिळत नाहीये.

सरकारने शेतकऱ्याच्या बांधावर खत देण्याची घोषणा केली, पण इथे दिवसदिवस रांगा लावून दुकानात देखील खत मिळत नाही. मी खताच्या उपलब्धते बद्दल जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली तेव्हा कन्नड तालुक्यासाठच्या एकूण खतापैकी ८० टक्के पुरवठा करण्यात आल्याचे सांगितले गेले. तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांनी देखील असाच दावा केला आहे, जर एवढे खत मिळाले असेल तर मग हंगाम संपत आला तरी शेतकऱ्यांच्या खत खरेदीसाठी रांगा कशा? हा माझा प्रश्न आहे.

महिला, वयोवृद्ध, पुरूष असे सगळेच उपाशीपोटी फक्त खत खरेदी करण्यासाठी सकाळपासून रांगा लावून आहेत. खताचा पुरवठा झाला, मग विक्रेत्यांनी ते शेतकऱ्यांना दिले का? जर दिले असते तर लोकांनी कोरोनाच्या संकटात स्वतःचा जीव धोक्यात घालून इथे रांगा लावल्या असत्या का? तर निश्चित नाही. सरकार आणि प्रशासनाकडून कितीही दावा केला जात असला तरी २५ टक्क्यांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना खत मिळालेले नाही असा दावा देखील हर्षवर्धन जाधव यांनी केला.
बांधावर खत देण्याचा सरकारचा दावा तर तद्दन खोटा आणि दिशाभूल करणारा आहे. कृषी अधिकारी सांगतात की कोरोनामुळे केवळ सुरुवातीच्या एक महिना शेतकऱ्यांना बांधावर खत देण्यात आले. पण इथे उपस्थित एकही शेतकरी हे मान्य करायला तयार नाही. मग याला जबाबदार कोण? असा सवालही जाधव यांनी केला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button