Amalner

अमळनेर:चोऱ्यांचे सत्र थांबेना..!धार येथून यात्रेतून दुचाकी चोरीस..!

अमळनेर:चोऱ्यांचे सत्र थांबेना..!धार येथून यात्रेतून दुचाकी चोरीस..!

अमळनेर येथील धार येथे सुरू असलेल्या यात्रेतुन मोटारसायकल चोरीस गेल्याची
घटना 6 डिसेंबर रोजी घडली असून मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की गोटू सुदाम भिल रा.सायने जि. धुळे ह. मु. गलवाडे 6 डिसेंबर रात्री आपल्या भाऊ व मित्राबरोबर होंडा शाईन मोटारसायकलवर (एम एच 18 बी एफ 3294) धार येथे यात्रेनिमित्त गेले होते. गाडी धार येथील अनिल पाटील यांच्या घरा समोर हॅण्डल लॉक न करता लावली आणि ते यात्रेत गेले.रात्री 3 वाजता यात्रेतून परत आल्यानंतर त्यांना जागेवर मोटारसायकल आढळून आली नाही. आजूबाजूला शोध घेतला असता मोटरसायकल आढळून न आल्याने मारवड
पोलिस ठाण्यात गोटू भिल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो. मुकेश साळुखे करीत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button