Amalner

Amalner:चोर सोडून संन्याशाला शिक्षा..खऱ्या वाळू चोरांवर हाथ उचलायची हिम्मत नाही मजुराला केले जखमी..!

Amalner:चोर सोडून संन्याशाला शिक्षा..खऱ्या वाळू चोरांवर हाथ उचलायची हिम्मत नाही मजुराला केले जखमी..!

अमळनेर सानेनगर जवळ असलेल्या स्मशानभूमी जवळ एका गरीब मजुराला वाळू चोरण्याच्या संशयावरून मारहाण केल्याची घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कृष्णा कौतिक भिल रा. लडगाव हा धनराज मधुकर पाटील यांच्या शेतात मजुरी करतो. 18 जानेवारी रोजी तो शेतात पाणी भरून नदी पात्रातून चालत साने नगर जवळ असलेल्या
स्मशानभूमीकडे येत असता पिंटू सरदार साळुखे रा साने नगर याने त्याला अडविले व तू नदीतून वाळू चोरतो असे म्हणत कृष्णा च्या हातात असलेली पावडी घेऊन
त्याच्या पायावर मारली.यामुळे कृष्णाचा पायाला गंभीर इजा झाली आहे.
कृष्णा भिल ने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास एएसआय रामकृष्ण कुमावत करत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button