Amalner

Amalner: विवाहाच्या वर्षपूर्ती निमित्त सुनील माया ने एच आय व्ही ग्रस्त कुटुंबातील मुलांना दिला “दिलासा”..

Amalner: विवाहाच्या वर्षपूर्ती निमित्त सुनील माया ने एच आय व्ही ग्रस्त कुटुंबातील मुलांना दिला “दिलासा”..

माया व सुनील ने आमच्या वैवाहिक जिवणाच्या वर्षपूर्तीनिमीत्ताने समाजाची सामाजिक बांधिलकी पार पडण्याच्या उद्देशाने एक छोटासा बदल करण्याच्या दृष्टीने पार पाडलेली एक भूमिका

26 जानेवारी हा आपल्या देशामध्ये प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो याच प्रजासंत्ताक दिनी मी व मायाने समाजाचे देणे लागतो या उद्देशाने एक सत्यशोधक पद्धतीने व समाजशील उपक्रमांनी विवाह 26 जानेवारी 2021 रोजी केला त्याच विवाहास बघता बघता एक वर्ष कधी पूर्ण झाले हे आम्हालाच समजलेच नाही पण पुन्हा त्याच उमेदीने त्याच अशाने व त्याच जिद्दीने व ध्येयाने पुन्हा वैवाहिक जीवनाच्या दुसर्‍या वर्षाची सुरुवात समाजाचे देणे लागतो या उद्देशाने फुल ना फुलाची पाकळी म्हणून आम्ही सांगली जिल्ह्यातील एच आय व्ही ग्रस्त कुटुंबातील मुला- मुलींचा सांभाळ करून त्यांना शिक्षण देणाऱ्या दिलासा भवन या सामाजिक संस्थेला भेट दिली. त्या वंचित असणाऱ्या मुला मुलींचे व शिक्षण संस्थेचे माहिती जाणून घेतली व त्यांना आम्ही केलेल्या आमच्या विवाह पद्धतीची थोडक्यात माहिती दिली व आम्ही आपल्या कुटुंब तीलाच एक भाग असणाऱ्या दिलासा भवन च्या बाल मित्रांना आमच्याकडून या वैश्विक महा मारीच्या रोगांचा सामना करण्यासाठी छोटीशी पण खूप लोक उपयोगी पडेल अशा कालावधीमध्ये आमच्या वैवाहिक जीवनाच्या वर्षपूर्ती निमित्त वाफारा मशीन आरोग्याच्या काळजी च्या दृष्टीने खूप महत्त्वाची असल्या चे विचार पूर्वक निर्णय घेऊन या मुलांना वाफारा मशीन भेट दिल्या व एक छोटीशी मदत करून आपल्या सामाजिक बांधिलकीची भूमिका पार पाडण्याचे काम मायाने व मी व आमच्या सहकाऱ्यांनी पार पाडले आमच्यासोबत माधव गडदे वर्षा गडदे आकाश पाटील रूपाली बनसोडे विराज बनसोडे हे सर्व सहकारी मित्र होते त्यांना देखील ही मदत करण्याची पद्धत खूप आवडली तसेच दिलासा भवण संस्थेच्या सर्व बाल मित्रांनी व संस्थेच्या स्टाफ बांधवांनी आम्हाला आमच्या वैवाहिक जीवनाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्या आमच्यासाठी खूप प्रेरणादायी व आनंददायी उर्जा दाई ठरतील अशा पद्धतीने आपल्या समाजातील सर्व विवाह वाढदिवस तसेच विविध कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये समाजामध्ये वंचित घटकांना थोडीशी जरी मदत केली तरी कोट्यावधी वंचित गरीब व गरजू व्यक्तींच्या अडचणी सुटतील आपलेच सुनिल व माया जनक्रांती टीम

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button