मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ‘विठ्ठलसाई’ कडून ११ लाख रुपये
लातुर प्रतिनिधी :-प्रशांत नेटके
कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या लढाईसाठी उमरगा तालुक्यातील मुरूम येथील विठ्ठलसाई साखर कारखान्याच्या वतीने ११ लाख तर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने दीड लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १८ एप्रिल रोजी देण्यात आले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन स्तरावरून विविध प्रयत्न केले जात आहेत .यासोबतच लॉकडाऊन मुळे गरजूंना मदत देखील पोहोचवली जात आहे.त्यामुळे सामाजिक बांधिलकीचा वारसा जपत विठ्ठलसाई व जिल्हा काँग्रेसच्या वतीने ही मदत करण्यात आली.विठ्ठलसाई साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्याकडे हे धनादेश सुपूर्द करण्यात आले. यावेळी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे आदींची उपस्थिती होती.






