Amalner

Amalner: राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा ने हिजाब विरोधी कृत्याचा निषेध

Amalner: राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा ने हिजाब विरोधी कृत्याचा निषेध

अमळनेर प्रतिनिधी, येथील राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाने कर्नाटक येथे हिजाब नघालण्याच्या आदेशाला विरोध दर्शवित केला निषेध.

कर्नाटक राज्यात महाविद्यालयात मुस्लिम महिलांना हिजाब घालून येण्यास बंदी घालण्यात आल्याने देशात मोठ्या प्रमाणात खळबळ माजली आहे. या निर्णया विरोधात मुस्लिम सह संविधान माननाऱ्यानी देशात ठीक ठिकाणी निर्देशने करीत असल्याने राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. अमळनेरात ही राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे तालुका अध्यक्ष नविद शेख यांच्या नेतृत्वाखाली महामहिम राष्ट्रपती सह देशाचे प्रधानमंत्री यांना प्रांताधिकारी यांच्या मार्फत निवेदन देऊन हिजाब विरोधी कृत्याचा विरोध दर्शविला तर संविधानात दिलेल्या मूलभूत अधिकाराचे हनन होत असल्याने त्याचे रक्षण करणे,हिजाब घालण्याला विरोध करणाऱ्या शैक्षणिक संस्थानां घटनेच्या कलम25 नुसार ताकीद द्यावी,मुस्लिम विद्यार्थिनींना विरोध करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी आदी मागण्याचे निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे तालुका अध्यक्ष नविद शेख,गुलाम नबी,सुलतान पठाण,शहीद शेख,अजर अली, जुबेर पठाण,अक्तर अली,शाबीर बागवान, नइम पठाण,मोहिज सय्यद,सलमान शेख,शोएब शेख,इम्रान अरब,अब्दुल मणियार आदी समाज बांधव उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button