Amalner

?️ अमळनेर कट्टा… अमळनेर ग्रामिण रुग्णालयात स्वतंत्र ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पासाठी आमदारांच्या हालचाली गतिमान जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी, सर्व कोविड रुग्णालयात भेट, रुग्ण संख्या घटल्याने व्यक्त केले समाधान.

?️ अमळनेर कट्टा… अमळनेर ग्रामिण रुग्णालयात स्वतंत्र ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पासाठी आमदारांच्या हालचाली गतिमान जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी, सर्व कोविड रुग्णालयात भेट, रुग्ण संख्या घटल्याने व्यक्त केले समाधान.

अमळनेर : येथील ग्रामिण रुग्णालयात स्वतंत्र ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी आमदार अनिल पाटील यांनी हालचाली सुरू केल्या असून डीपीडिसी च्या माध्यमातून 60 लाख रु खर्चातून हा प्रकल्प उभारण्यास जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी तत्वतः मंजूरी दिल्याने लवकरच हा प्रकल्प उभारला जाणार आहे.

यासंदर्भात आमदार पाटील यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ चव्हाण यांना पत्र देऊन प्रत्यक्ष चर्चा देखील केली आहे. त्यास हिरवा कंदील मिळाल्याने प्रकल्पासाठी योग्य जागा सुचवून तांत्रिक बाबी पूर्ण करण्याचे काम सुरू झाले आहे. दरम्यान आमदार अनिल पाटील यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालय आणि इंदिरा भवनातील कोविड सेंटर व शहरातील सर्व खाजगी कोविड हॉस्पिटलला भेटी देऊन डॉक्टरांशी चर्चा केली यावेळी त्यांनी सामान्य व ऑक्सिजन बेडची उपलब्धता, ऑक्सिजन आणि रेमीडिसिव्हर इंजेक्शन चा पुरवठा, इतर आवश्यक बाबी, रुग्णालयातील स्टाफची स्थिती जाणून घेत रेमीडिसिव्हर आणि ऑक्सिजनच्या उपलब्धतेसाठी तेथूनच जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांशी चर्चा करत मागणी देखील केली.

तसेच लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी अमळनेर तालुक्यात जास्तीत जास्त लसी उपलब्ध करण्याची मागणी आमदारांनी केली. यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांनी दोन दिवसांपूर्वी अमळनेर भेटीत अमळनेर स्थानिक प्रशासन कोरोना उपाययोजना राबविण्यात जळगाव जिल्ह्यात अव्वल असल्याचे सांगून कौतुक केले होते, या बाबीचे आमदार पाटील यांनी देखील कौतुक करून संपूर्ण प्रशासकीय टीमचे अभिनंदन केले.

सर्व रुग्णालयात रुग्णसंख्या घटल्याने व्यक्त केले समाधान-
यावेळी शहरातील सर्वच रुग्णालयाच्या भेटीत प्रत्येक ठिकाणी 50 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त बेडस खाली दिसून आल्याने आमदारांनी समाधान व्यक्त केली, यामुळे रेमीडिसिव्हर ची मागणी देखील कमी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले, केवळ काही जण आजार अंगावर काढून उशिराने दाखल होत असल्याने रुग्ण गंभीर होत असल्याची माहिती अनेक डॉक्टरांनी दिली, त्यामुळे कुणालाही थोडा देखील प्रकृतीत बदल वाटत असल्यास त्यांनी डॉक्टरांना दाखवून त्यांच्या सल्ल्याने अँटीजन चाचणी करून घ्यावी आणि बाधित असल्यास तात्काळ विलगीकरन करून उपचार सुरू करावेत, आणि त्रास जास्त असल्यास तात्काळ रुग्णालयात दाखल व्हावे एवढी काळजी घेतल्यास कोणत्याही रुग्णास धोका होणार नाही अशी माहिती डॉक्टरांनी आमदारांना दिल्याने आमदारांनी देखील तमाम जनतेस डॉक्टरांच्या वरील सूचनेचे काळजीने पालन करावे आणि मास्क व सुरक्षित अंतराचे नियम काटेकोरपणे पाळावे असे आवाहन जाहीररीत्या केले.

अमळनेरात ऑक्सिजन प्लांट साठी पालकमंत्री व प्रशासनास आग्रह-
अमळनेर येथे गंभीर रुग्णांना तात्काळ ऑक्सिजन ची उपलब्धता होण्यासाठी अमळनेर येथे स्वतंत्र ऑक्सिजन प्लांट चा आग्रह आमदारांचा असल्याने त्यांनी पालकमंत्री प्रशासनास पत्र दिले आहे, त्यात त्यांनी नमूद केले आहे की कोरोणाच्या लढाईत ऑक्सिजन हि सर्वात महत्वाची गरज आहे. रुग्णालयांचा ऑक्सिजन पुरवठा खंडीत होण्याच्या किंवा त्यामुळे कोरोणा रुग्णांचा मृत्यु होण्याच्या घटना काही ठिकाणी झाल्याचे वृत्त आहे, महाराष्ट्रासोबत आता इतरही अनेक राज्यातील कोरोणा रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. अमळनेर येथे ग्रामिण रुग्णालय व इंदिरा गांधी भवन येथे एकुण 55 ऑक्सिजन युक्त खाटांच्या कोविड सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. येत्या काही दिवसात ऑक्सिजनची कमतरता
मोठ्या प्रमाणावर जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे ऑक्सिजन पुरवठ्याच्या बाबतीत अमळनेर येथिल ग्रामिण रुग्णालय आत्मनिर्भर होण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. भविष्यातील गरज लक्षात घेऊन अमळनेर येथे ऑक्सिजन पुरवठा करणारा शासकिय ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यसाठी तातडीने कार्यवाही करण्यात यावी अशी विनंती आमदार पाटील यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांकडे केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button