Amalner

Amalner: पैसा नगरपालिकेचा..नाव गावाचा पत्ता नाही.. सामाजिक संस्था होताय धड….!नगरपालिकेने खोलले धर्मदान खाते..?

Amalner: पैसा नगरपालिकेचा..नाव गावाचा पत्ता नाही.. सामाजिक संस्था होताय धड….!नगरपालिकेने खोलले धर्मदाय खाते..?

अमळनेर शहरात नगरपालिकेच्या पैश्यां नी पर्यायाने नागरिकांच्या करातून मिळणारा आणि शासनाचा निधी अश्या पैशांवर उभारण्यात आलेल्या जिजाऊ जीम, सावित्रीबाई फुले अभ्यासिका, छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर, इंदिरा भवन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन, बहुउद्देशीय सभागृह अशा कोट्यवधी रूपये खर्चाच्या वास्तु उभारल्या आहेत.आज ह्या वास्तू कोणत्याना कोणत्या ट्रस्टला सोपविण्यात आल्या आहेत. नाममात्र दराने पालिकेची मैदाने, उद्याने, मोकळ्या जागा, वास्तु सामाजिक संस्थांच्या नावाखाली मिळवायच्या आणि त्याचा व्यावसायिक वापर करून लक्षावधी रुपये कमायचे असे उद्योग करणारे काही महाभाग आहेत. पालिकेकडून नगण्य दरात या वास्तु पदरात पाडून घेत काहींनी धंदा चालवत अव्याहत खोर्‍याने पैसे कमाई सुरू ठेवली आहे. नाट्यगृह लग्न समारंभासाठी देण्यात येत आहे. या वास्तुंमधून कोणती उद्दिष्ठे साध्य होत आहेत? नगरपालिकेला मोठ्या कमाईचा स्त्रोत सुरू झाला का? हा संशोधनाचा आणि संशयाचा विषय. लोकनियुक्त नगराध्यक्षा जिजामाता कृषिभूषण पुष्पलता साहेबराव पाटील यांना गायी धुऊन कुत्र्यांना दूध पाजण्यात का सारस्य वाटलं असावं? असा प्रश्‍न सर्वसामान्य अमळनेरकरांना पडलेला आहे.

अमळनेर येथील नगरपालिकेच्या वतीने तब्बल अडीच कोटी रूपयांचा निधी खर्ची पाडत स्टेट बँकेच्या वरील मजल्यावर महिलांसाठी सर्व सुविधांयुक्त अत्याधुनिक जीम व अभ्यासिका उभारण्यात आलेली आहे. मात्र, पालिकेने जीम व अभ्यासिका स्वतः न चालविता शहरातील ‘अमळनेर महिला मंच ट्रस्ट’ला 3 वर्षांसाठी नाममात्र दीड लाख रूपयांमध्ये करार करून चालवायला दिली आहे. देखभाल दुरूस्तीची जबाबदारी सुद्धा या ट्रस्टकडे निश्‍चित करण्यात आलेली असून त्याकडे कानडोळा केला जात आहे. ‘आयजीच्या जीवावर बायजी उदार’ या म्हणीचा प्रत्यय ट्रस्टच्या कारभारावरून येत आहे. पालिकेच्या पर्यवेक्षकालाही इकडे फिरकू दिले जात नसून जीम, योग व अभ्यासिकेच्या माध्यमातून कमाई केली जात असल्याचा आरोप होत आहे.विशेष म्हणजे अजून ही ट्रस्ट पूर्णपणे रजिस्टर झालेली नाही. धर्मदाय आयुक्तांकडून अजून संस्था नोंदणी क्र ह्या अमळनेर महिला मंच ट्रस्ट ला प्राप्त नाही.

स्टेशनरोडवरील स्टेट बँकेवरील जिजाऊ महिला जीम आणि सावित्रीबाई फुले अभ्यासिकेच्या ठिकाणी नगरपालिकेच्या फार्म विक्री विभागातील कर्मचारी परिचारिका राधा नेतले यांची जीम व अभ्यासिकेत पर्यवेक्षक म्हणून तत्कालिन मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड यांनी नियुक्ती केली होती. मात्र पालिकेचा अमळनेर महिला मंच ट्रस्टशी करार झाल्यानंतर या पर्यवेक्षकाला तिकडे फिरकू सुद्धा दिले जात नाही. येथे अत्याधुनिक साधन साहित्य असून ट्रस्टने साध्या स्टॅबेलायझरची सुद्धा तजवीज केलेली नाही. त्यामुळे विद्युत पुरवठा कमी अधिक झाल्यास ही साधने निकामी होण्याची शक्यता आहे.

ट्रस्टकडून जीमसाठी प्रति महिला 500 रूपये, योगसाठी 500 रूपये तर अभ्यासिकेसाठी 300 रूपयांची आकारणी करण्यात येते. ट्रस्टकडून या ठिकाणी विविध उपक्रम राबविण्यात येतात मात्र त्यात नगरपालिकेचा नामोल्लेख सुद्धा नसतो, हे विशेष. हल्ली शिवजयंती निमित्त सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले असून त्यात जीम व अभ्यासिकेचा ‘सर्व कार्यभार अमळनेर महिला मंडळ ट्रस्टच्या हाती’ असेच थेट नमूद केले आहे. आयजीच्या जीवावर बायजी उदार असलेल्या या ट्रस्टने या वास्तुचा भनका उडविण्याआधी पालिका प्रशासनाने हस्तक्षेप करत करारातील अटी व शर्थींचे पालन होत आहे की नाही याची खातरजमा करावी. कोणत्या साहित्याचा खराबा झाला असेल तर तो त्यांच्याकडून नव्याने मागवावा,पाणीपट्टी आकारावी, विज बील नियमित भरले जाते की नाही हेही तपासण्याची आवश्यकता आहे.

सध्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह हे देखील एका संस्थेला दिले असून नाट्यगृहातील चोरी हा संशोधन व विचारात पाडणारा मुद्दा आहे. येथे अनेक तरुण सिगारेट ओढतात, अनेक व्यसनी मुले येथे इंस्टा साठी रील बनवतात,तरुण तरुणी इथे लव्ह लफाटा करतात अनेक अवैध प्रकार महाराजांच्या समक्ष घडतात याला जबाबदार कोण असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. मध्यंतरी नाट्यगृहाचे दरवाजे तुटलेले होते.एकेका कार्यक्रमाचे हजारो रु घेतले जातात पण त्या प्रमाणात स्वच्छता, देखभाल होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

यात भरीस भर म्हणून ह्या सर्व प्रकारात निविदा प्रक्रिया राबविण्यात आली किंवा नाही हाही प्रश्न आहेच..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button