पुणे काँग्रेस भवनाची तोडफोड
संग्राम थोपटेंना मंत्रिपद न मिळाल्याने समर्थक आक्रमक..
पुणे दत्ता पारेकर
पुण्यातील काँग्रेस भवनात
जबरदस्त तोडफोड करण्यात आली आहे.
पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर
संग्राम थोपटे यांना मंत्रीपद न मिळाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पुणे काँग्रेस भवनावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच हल्लाबोल केला. तेथील खुर्च्यांची आणि टेबलांची तोडफोड केली. या ठिकाणी संग्राम थोपटे जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात घोषणाबाजी देण्यात आली. संग्राम थोपटे यांनी पक्षासाठी मेहनत दिली. संग्राम थोपटे आमचं आशास्थान आहे. त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं म्हणून आम्ही काँग्रेस भवन फोडलं असं युवा कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.
आगामी काळात काँग्रेस जिल्ह्यातून संपवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असंही काँग्रेस कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. बाळासाहेब थोरात यांनी घोडेबाजार करुन मंत्रिपदं वाटली असाही आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. बाळासाहेब थोरात यांनी शब्द पाळला नाही. आमच्यावर झालेल्या अन्यायाचा आज उद्रेक झाला असंही काँग्रेस कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.






