Amalner

अमळनेर:गावठी दारू विक्रेत्यावर एलसीबीचा छापा…

अमळनेर:गावठी दारू विक्रेत्यावर एलसीबीचा छापा…

अमळनेर येथील कलाली येथे सुरू असलेल्या अवैध गावठी दारू विकत असलेल्या व्यक्तीवर एलसीबीकडून कारवाई करत मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतीत सविस्तर माहिती अशी की स्थानिक गुन्हे शाखा जळगाव येथील पो.ना. प्रवीण मांडोळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पो. नि. किरणकुमार बकाले यांच्या आदेशानुसार कलाली येथे गावठी दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश मिळाले होते या अनुषंगाने कार्यवाही साठी जात असताना मारवड पोलीस ठाण्याचे हे. कॉ. सुनील अगोने व हे. कॉ. बागवान यांना सोबत घेऊन कलाली येथे छापा टाकला असता मधुकर मन्साराम कोळी हा गावठी दारूचा कॅन घेवून विक्रीच्या उद्देशाने बसलेला आढळून आला. सदर व्यक्तीकडून 400 रु किमतीची दहा लिटर गावठी दारू मिळून आली .जागेवरच नमुने घेण्यात येऊन पंचनामा करण्यात आला. सदर इसमाविरुद्ध मारवड पोलिसात मु. प्रो. अँक्ट 65 ई अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित लेख

One Comment

Leave a Reply

Back to top button